आपला जिल्हासामाजिक

आय एनएस शिवाजी येथे इंद्रायणी ब्लाॕकमधील एका तरूणाची खोलीतील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या..

पहाटे परेडसाठी या इंद्रायणी अभ्यासिकेसमोरून परेडसाठी जात असताना पहाटे ५.४० वाजता जात असता त्यांना लक्षात आले..

Spread the love

आय एनएस शिवाजी येथे इंद्रायणी ब्लाॕकमधील एका तरूणाची खोलीतील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या..A young man from Indrayani Block committed suicide by hanging himself from the room fan at INS Shivaji.

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २२ जुलै.

आय एनएस शिवाजी येथे इंद्रायणी ब्लाॕकमधील एका तरूणाची खोलीतील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली.आत्महत्या मागचे कारण समजू शकले नाही. लोणावळा शहर पोलिसांनी आकस्मित मयत अशी नोंद केली असून मृतदेह खंडाळा येथे उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

लोणावळा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्तीचे नाव- अमित कुमार (वय- २० वर्षे , राहणार 3. बी इंद्रायणी ब्लॉक , आय एन एस शिवाजी लोणावळा, ता. मावळ जि. पुणे ) असे असून पहाटे सहा वाजून वीस मिनिटांपूर्वी त्याने अभ्यासिकेसमोर असलेल्या ब्लाॕकमधील खोलीमधे पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या बाबत खबर देणार योगेश बाबुलाल शर्मा( वय -२३ वर्ष, व्यवसाय नोकरी, रा. सध्या रुम नं 2 सी इंद्रायणी ब्लॉक आय एन एस शिवाजी लोणावळा, . मावळ जि. पुणे ,मुळ रा. ७५९३ बाबा फरीद पुरी , वेस्ट पटेल नगर , नवी दिल्ली ).
यांनी लोणावळा शहर पोलिसांना कळविल्यावरून शहर पोलिस स्टेशनचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली घटनेची माहिती घेऊन जागेवरच पंचनामा केला. वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेत तपासणी केली असता , अमितकुमार हा पहाटे सहा वाजून वीस मिनिटांपूर्वी मरण पावल्याचे घोषित केले.

मयत ता.वेळ दि. २१ रोजी ६.२० वा चे पुर्वी इंद्रायणी ब्लांक आय एन एस शिवाजी लोणावळा इंद्रायणी ब्लॉकमध्ये असणारेअभ्यासिकेमध्ये लोणावळा, ता. मावळ जि. पुणे ) येथे झाल्याने येथे काही मुले खिडकीसमोर उभी असल्याचे खबर देणार यांनी पहाटे परेडसाठी या इंद्रायणी अभ्यासिकेसमोरून परेडसाठी जात असताना पहाटे ५.४० वाजता जात असता त्यांना लक्षात आल्यावर ते थांबले. तेव्हा त्यांना घटना समजली.

याबाबत मयत दाखल वेळ काल ता.२१ दु.३.५३ अशी असून पोलिसांनी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.या घटनेची हकीगत अशी, खबर देणार यांनी खबर दिली की ता. २१ रोजी पहाटे आम्ही ५.४० . चे सुमारास इंद्रायणी ब्लॉकमध्ये असणारे अभ्यासिकेसमोरुन परेडसाठी जात असताना अभ्यासिकेचा दरवाजा बंद होता व काही मुले तेथे उभी होती; म्हणुन मी मोबाईलच्या उजेडात पाहीले असता ,अमित कुमार हा अभ्यासिकेच्या पंख्याला लटकत होता. म्हणुन  तेथील अधिकारी संतोष पटेल यांना सांगितले . त्यांनी आय एन एस शिवाजी येथील डॉक्टर व लोणावळा येथीस पोलीसांना फोनद्वारे कळविले . त्यानंतर आम्ही अभ्यासिकेचा दरवाजा बाहेरुन जोरात ढकलुन उघडला. सोबत असलेल्या डॉक्टरांनी त्यास तपासले असता, त्याचे शरीर थंड पडले होते. त्यानंतर पोलीसांनी त्यास आय एन एस शिवाजी येथील दवाखान्यात नेले असता; तेथील डॉक्टरानी त्यास तपासुन उपचारापुर्वीच मयत झालेचे सकाळी घोषीत केले आहे.

या आत्महत्या प्रकरणी आय एन एस शिवाजी येथील अधिकारी यांनी अमित कुमार याचे वडील हरी कुमार यांना कळविले असून अमित कुमार, ( वय -२०वर्षे रा. ३ बी इंद्रायणी ब्लॉक आय एन एस शिवाजी लोणावळा) याने याने ता.२१ पहाटे इंद्रायणी ब्लॉकमध्ये असणारे अभ्यासिकेमधील पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केली . त्यास आयएनएसमधील डॉक्टरानी मयत झाल्याचे घोषित केले असून पुढील तजवीज व्हावी वगैरे मजकुराचे खबरीवरून मयत रजिस्टरी दाखल करून दाखल मयताचा पुढिल तपास पो. निरिक्षक सिताराम डुबल .यांच्या आदेशान्वये पो.नाईक शिदे करीत आहेत.या घटनेबाबत ठाणे अंमलदार पो.हवालदार महादेव म्हेत्रे यांनी आकस्मित मयत दाखल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!