ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या विविध मागण्यांचं पत्र

Spread the love

कोल्हापूर जिल्ह्यामधे आरोग्य विभागाच्यावतीने उपकेंद्र स्तरावर जवळजवळ 380 समुदाय आरोग्य अधिकारी गेल्या दीड वर्षांपासून सेवा बजावत आहेत.ही सेवा बजावत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.अमोल रावते,कार्याध्यक्ष डॉ.संग्राम शिंदे,राज्य महासचिव अश्रफ शेख,जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत भोसले,कोल्हापूर जिल्हा कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजित पवार, आरोग्य राज्यमंत्री श्री राजेंद्र यड्रावकर यांना राज्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या समस्या व मागणी चे पत्र समुदाय आरोग्य अधिकारी श्री. कुमार तिवडे ,श्री.मल्लिकार्जुन तेलगू,डॉ.प्राजक्ता गुरव,डॉ.स्वाती कोळी,श्रीम.प्रियांका दशवंत यांनी दिले
सदर निवेदन घेवून उपमुख्यमंत्र्यांनी,सर्व समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालीन असे आश्वासन दिले व संपूर्ण पत्र त्यांनी गाडीमध्ये बसून वाचले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!