ताज्या घडामोडी

ओबीसीची  जातनिहाय जनगणना होत नाहीत तोपर्यंत ओबीसी चे प्रश्न सुटणार नाहीत.- शब्बीर अन्सारी

Spread the love

पुणे – राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मुख्य कार्यालय निवारा सोसायटी ,धनकवडी येथे दि.३०.१.२०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता ओबीसी फेडरेशन बाबत प्राथमिक मिटिंग आयोजित केली असता यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ .प्रल्हाद वडगांवकर,सरचिटणीस सत्यशोधक रघुनाथ ढोक, मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी मुंबई ,ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा सखाराम कुदळे आणि बारा बलुतेदार संघटना,पुणे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ शेळके  ,मुस्लिम समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर्किटेक्ट सिराज शेख उपस्थित होते.यावेळी मिटिंग च्या वेळी सुरुवातीला रघुनाथ ढोक यांनी भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन केले तर त्यांचे मागे सर्वांनी उद्देशिका म्हंटली.
या प्रसंगी शब्बीर अन्सारी म्हणाले की ओबीसी मध्ये निष्ठावंत कार्यकर्ते मिळाले तरच ओबीसीचे मूळ प्रश्न सुटतील व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी डॉ .प्रल्हाद वडगांवकराची प्रामाणिक ईच्छा आहे .सर्व ओबीसी संघटनानी एकत्र येऊन राष्ट्रीय फेडरेशन तयार करावे. पुढे अन्सारी म्हणाले की ओबीसीची  जातनिहाय जनगणना होत नाहीत तोपर्यंत ओबीसी चे कोणतेच प्रश्न सुटणार नाहीत .त्यामुळे हा एकमेव अजेंडा वापरून सरकारला ओबीसीची जनगणना व स्वतंत्र बजेट निर्माण करण्यासाठी भाग पाडले पाहिजे .यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की ज्या प्रमाणे आर्थिक मागास च्या उत्पन्न मर्यादा वाढवून ज्या त्या वर्षीच शिष्यवृत्ती वाटप केली जाते तसेच डॉ .पंजाबराव निर्वाह भत्ता देण्यास सुरुवात केली तशी ओबीसी साठी सुविधा नसून वेळेत शिष्यवृत्ती देखील मिळत नाही.अनेक वर्षाची शिष्यवृत्ती पेंडिंग असून मुलांना कॉलेज सोडतेवेळी अडचण निर्माण होत आहे.तसेच नॉन क्रिमीलीयर ची मर्यादा ८ लाखावरून तातडीने १५ लाख मर्यादा करावी .त्यामुळे मुले शिक्षण व शिष्यवृत्ती पासून वंचित रहाणार नाहीत. खुल्या प्रवर्गातील रिक्त जागेवर  गुणवत्तेच्या आधारे राखीव कोट्यातील उमेदवाराची नियुक्ती केली जावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने न्यायालयाचे देखील ढोक यांनी अभिनंदन केले व पुढे रघुनाथ ढोक  म्हणाले की उत्पन्न दाखल्याची योग्य पडताळणी करूनच दाखले देण्यात यावेत.
मिटिंग चे अध्यक्ष डॉ.वडगांवकर म्हणाले की मंडल आयोग साठी अनेक ओबीसी नेते ,संघटना यांनी प्रयत्न केले त्या मध्ये शब्बीर अन्सारी यांनी मोलाची भुमिका बजावून ओबीसी ला जागृत करण्याचे काम केले .असे कार्यकर्ते आता राहिले नसुन त्या साठी पुर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते शोधून त्यांच्या मानधनाची सोय करणे व त्यांना ओबीसीच्या प्रश्नांची सखोल माहिती देणे काळाची गरज आहे. यासाठी १३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजता उद्यान प्रसाद कार्यालय येथे फेडरेशन स्थापन करण्यासाठी महत्वाची मिटिंग आयोजित केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र मधुन अनेक ओबीसी संघटनाचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थितीत राहावे असे देखील वडगांवकर यांनी आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ शेळके तर आभारप्रदर्शन आंनदा कुदळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!