ताज्या घडामोडी

बुलढाणा जिल्हा भावसार क्षत्रिय समाजाचा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ खामगांव येथे संपन्न.

Spread the love

प्रतिनिधी- डॉ.सुनील ना.भावसार

दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी बुलढाणा जिल्हा भावसार क्षत्रिय समाज मंडळ, खामगांव भावसार क्षत्रिय समाज मंडळ व खामगांव भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळ व्दारा आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ खामगांव येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ अहिर हे होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून खामगांव भावसार क्षत्रिय समाज अध्यक्ष श्री.अनंत गजानन रंगदळे, बुलढाणा जिल्हा भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळ अध्यक्षा सौ.रजनीताई जुनागडे, खामगांव भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळअध्यक्षा सौ.अनिताताई मावळे, जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्राचार्या सौ.अनुराधाताई भावसार, बुलढाणा जिल्हा भावसार क्षत्रिय समाज कार्याध्यक्ष श्री.सुरेश मावळे, बुलढाणा जिल्हा भावसार क्षत्रिय समाज सचिव श्री.सुभाष बाहेकर आदी मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.
समारंभात के.जी., १ली पासून सर्व शाखा पदवीधर, पदविका, आय टी आय, क्रीडा क्षेत्र, एम,बी.बी.एस., एम.डी. च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्ह्यातील बहुसंख्य समाज बंधु-भगीनी उपस्थित होते.
समारंभाचे सुत्रसंचलन खामगांव भावसार क्षत्रिय समाज मंडळाचे सचिव श्री.सतीश भावसार यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळाचे पदाधिकारी श्री चंद्रकांत सेवलकर यांनी केले.समारंभ यशस्वी करणे करीता
सर्वश्री प्रा.पद्माकर तिडतीडे,श्री.गजानन सेवलकर,श्री.राम मावळे,श्री. कैलास ताकवाले, श्री.अरुण फुटाणे, श्री.सतीश मुधोळकर, श्री.गजानन देवताळु, श्री.दत्तात्रय रंगदळे, श्री.केशव अहिर, श्री.घनश्याम भारोटे तसेच मंडळाचे युवा कार्यकर्ते डॉ. प्रतिक भावसार, डॉ. प्रसाद भावसार, श्री.सागर सेवलकर, श्री.आनंद देवताळु, श्री.राहुल अहिर, श्री.सौरभ तिडतीडे, श्री.प्रसाद तिडतीडे, श्री.आदित्य मुधोळकर, श्री.ऋषिकेश मावळे, श्री.अर्जुन मावळे, श्री.वैभव मावळे श्री.खंडेतोड इत्यादीनी अथक प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!