ताज्या घडामोडी

कोकणातील विविध प्रश्न घेऊन रयत क्रांती संघटना उतरणार मैदानात – माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत….!

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

राजापूर: – कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आजही न्याय मिळालेला नाही, अनेक प्रश्न आजही प्रलंबीत आहेत. त्यामुळे भविष्यात कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातुन जनआंदोलन उभारावे लागेल. तसेच राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना अशा प्रकल्पांच्या माध्यमातुन स्थानिक पातळीवर विकास होणार असेल आणि रोजगार निर्मिती होणार असेल तर स्थानिकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प राबविला पाहिजे असेही, आ. सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

आमदार सदाभाऊ खोत यांनी शेतकरी, बेरोजगार, प्रकल्पग्रस्त, कामगार, विद्यार्थी यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. आ. सदाभाऊ खोत यांनी या दौऱ्याची सुरूवात शुक्रवारी सिंधुदुर्गातुन केली. शनिवारी राजापूर तालुक्यात मौजे तुळसवडे येथे यात्रेचे भव्य स्वागत करुन मिरवणुक काढण्यात आली, तसेच गावाच्या विकासासाठी भरगोस निधी दिल्याबद्दल आमदार सदाभाऊ खोत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर आ.सदाभाऊ खोत यांनी गोवळ गावातील सेंद्रीय शेतीला भेट दिली व प्रगतशिल शेतकऱ्यांशी संवाद साधला. नंतर राजापूर शासकिय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली.
आपण आमदार म्हणून भविष्यात पर्यावरण व कृषी पर्यटनातुन विकास साधण्यासाठी राजापूर तालुक्यातील एक गाव दत्तक घेणार असल्याची घोषणाही यावेळी आ. सदाभाऊ खोत यांनी केली. कोकणातील शेतकऱ्यांना सुयोग्य अशा मार्गदर्शनाची आवश्यकता असून येथील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही खोत यांनी यांनी यावेळी सांगितले.
कोकणात कोकण रेल्वे आणण्यामध्ये स्वर्गीय मधू दंडवतेंचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांची आठवण म्हणून कोकणात त्यांचे भव्य स्मारक झाले पाहिजे व यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर राजापूर रेल्वे स्थानकाला कै. मधू दंडवते यांचे नाव द्यावे यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री व राज्य मंत्री यांची भेट घेऊन तसे पत्र देणार असल्याचे खोत यांनी सांगितले. ‌ . आ. सदाभाऊ खोत मागील सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री असताना मंजुर झालेल्या तालुक्यातील पांगरे बुद्रुक प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या असलेल्या तक्रारी व मागण्यांबाबत प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार सौ. शीतल जाधव लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी आ. खोत यांनी चर्चा केली व तात्काळ प्रलंबित मागण्या पुर्ण करणेबाबत सुचना केल्या.
या दौर्‍यादरम्यान मौजे ताम्हाणे गावातील काही ग्रामस्थ भेटायला आले. त्यांनी मला त्यांच्या ताम्हाणे पहिली वाडी येथील अर्धवट बांधकाम होऊन थांबलेल्या धरणाला माहीती दिली आणि तात्काळ या धरणाची पाहणी केली. खरतरं लोकांच्या करांमधूनच शासन धरणांसारखे प्रकल्प उभा करत असते. शासन त्याच्यावर करोडो रुपयांचा निधी खर्च करत असते. परंतु असे प्रकल्प अर्धवट स्वरूपात राहिली, तर त्या खर्च केलेल्या निधीचा चुराडा होतो आणि भविष्यात तोच प्रकल्प पुन्हा नव्याने वाढीव अंदाजपत्रके करुन निधी उभारून करावा लागतो. ताम्हाणे धरण जवळजवळ २० ते २१ वर्ष धरण मंजुर होऊन देखील शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे हा प्रकल्प अर्धवट स्वरुपात धुळ खात पडला आहे. या धरणाला भेट देऊन सदर धरणाबाबत शासन दरबारी पाठपुरावा करुन त्याला निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील पाचल विभागातील काजिर्डा धरण प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळूवन देण्यासाठी त्या धरणाला भेट देऊन ग्रामस्थांची भेट घेतली. गेले 25 वर्षे काजिर्डा ग्रामस्थांनी जामदा प्रकल्पाविरोधात संघर्ष करून लढा सुरू ठेवला आहे. बंद असलेल्या या प्रकल्पाचे काम सद्यस्थितीला पुन्हा सुरू करण्यात आले असून यावेळी ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आलेले नाही. यासाठी लवकरच आदोंलनाचा पहिला टप्पा आम्ही सुरू करू अन् लाखोच्या संख्येने मैदानात उतरु, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रशासनाला दिला आहे.
या दौऱ्याला भाजपा जिल्हाउपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव, भाजपा सहकार सेल जिल्हाध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, महिला आघाडी अध्यक्षा सौ. श्रृती ताम्हनकर, पंढरीनाथ आंबेरकर, राजा काजवे, पांगरे सरपंच वैष्णवी कुळये, सौ, शितल पटेल, शितल रहाटे, सोनल केळकर, रिफायनरी समर्थक धोेपेश्वर ग्रामीण समितीचे पंढरीनाथ आंबेरकर, काजिर्डा सरपंच अशोक आर्डे, ताम्हाणे सरपंच वाफेलकर, गोवळ सरपंच अभिजित कांबळे, सरचिटणिस समिर खानविलकर, अरविंद लांजेकर, तुळसवडे सरपंच सुप्रिया आडिवरेकर, उपसरपंच संजय कपाळे, स्विय सचिव आदिनाथ कपाळे, संतोष आरावकर, पुरूषोत्तम खांबल, विनायक कदम, जाधव, अमोल सोगम इ. उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!