ताज्या घडामोडी

पत्रकार दिन ६ जानेवारी १८१२ बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस

Spread the love

०६ जानेवारी १८३२ “दर्पण” ची सुरुवात* *’दर्पण’ म्हणजे ,”निर्भिड , निष्पक्ष, ध्येयवादी व वास्तवाला कवटाळणाऱ्या पत्रकारितेची “गाथा” सकारात्मक आणि तत्वनिष्ठ समाजाभिमुख पत्रकारांची फौज म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेतील मातीशी नाळ असणारी व वास्तवाला कवटाळणारी पत्रकारिता असते.पत्रकारितेतील ध्येये, उद्दिष्टे व स्वरूप बदलत गेले तरी “पत्रकारितेची मूळ मूल्ये कायम आहेत
वर्तमानपत्र,साप्ताहिक , पाक्षिक , मासिक ते सोशल मिडिया या क्षेत्रातील पत्रकारांनी प्रसंगी जीव धोक्यात घालून, तुरुंगवास भोगून, सत्ताधाऱ्यांचा राग व त्रास सहन करुन पत्रकारिता हे “सतीचं वाण” समजून व घरादारावर तुळशीपत्र ठेवून केलेल्या कामाचा लेखाजोखा म्हणजे “पत्रकारिता”
बाळशास्त्री जांभेकर हे आठ भाषांवर प्रभुत्व मिळविणारे भाषाप्रभू होते‌. आभासी जगातही वास्तव दाखविणारा “दर्पण” ने पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती.पाश्चात्यविद्या, विज्ञान , शिक्षण व ग्रंथालय यावर भर देऊन त्यांनी समाजाला “आरसा” दाखविला.*
*कृष्णराव भालेकर यांनी “दीनबंधू ” महात्मा फुले यांची प्रेरणा घेऊन शेतकरी , कष्टकरी, मजूर यांच्या होणाऱ्या हाल अपेष्टा , जातिभेद निर्मूलन व अंधश्रद्धा यावर भर देत पत्रकारिता बहरत गेली. सावकाराच्या जुलुमास वाचा फोडली गेली.”दीन लोकांचा बंधू” म्हणून कृष्णराव भालेकर यांचे योगदान मोठे होते.*
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पत्रकारिता म्हणजे पत्रकारितेचा जाज्वल इतिहास आहे.केसरी व मराठा ही स्वातंत्र्य चळवळीची अस्त्रे होती.राष्ट्र उभारणी , राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान , स्वदेशी व इंग्रजा विरोधात असंतोष निर्माण करण्याचे काम लोकमान्यांच्या पत्रकारितेने केले.
गो ग आगरकर यांनी केसरी संपादक व सुधारक मधून स्त्री शिक्षण,विधवा विवाह यातून समाजपरिवर्तनाच्या क्रांतिकारी प्रक्रियेला सुरुवात केली. व्यापार ,शिक्षण व अर्थकारण यावरही सुधारात्मक भाष्य केले गेले.*
*खंडेराव बागल “हंटरकार”अस्पृश्य ,सोवळे ओवळे , सामाजिक अनिष्ट रूढी परंपरा यावर काम केले.”समता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ” यासाठी काम केले.*
*काकासाहेब खाडिलकर उपसंपादक म्हणून काम. नवाकाळ ने खादी प्रचार, हिंदू मुस्लिम ऐक्य,चरखा, स्वदेशी, सूतकताई , अस्पृश्यता यावर काम केले.*
*तानुबाई बिर्जे दीनबंधू उपसंपादक.ब्राम्हनेतर चळवळीच्या पहिल्या महिला संपादक.सामाजिक विषमतेवर प्रहारा बरोबर राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनांना स्थान दिले गेले*
*श्रीपतराव शिंदे म्हणजे ” विजयी मराठाकार ” सत्यशोधक समाजाचे काम. प्रबोधनाच्या पणत्या लावून निद्रीत समाजाला उजेड दाखविण्याचे काम केले.*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’,’समता’, ‘प्रबुद्ध भारत’ याद्वारे अस्पृश्य व बहिष्कृत समाजाची कैफियत मांडली. पत्रकारिकेतून मानवमुक्तीची आणि नव भारताच्या निर्मितीची गाथा मांडली.*
*आचार्य प्र के अत्रे यांचा मराठा व नवयुग यामुळे पत्रकार हा ‘रायटर आणि फायटर ‘ असतो.संयुक्त महाराष्ट्र चळवळ, लोकशिक्षण,राष्ट्र उभारणी, समाजहीत याबरोबरच साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर एकाचवेळी प्रहार करण्याचे काम निर्भिडपणे केले.*
*नानासाहेब परुळेकर ( सकाळ), पद्मश्री बाळासाहेब पाटील ( सत्यवादी), पद्मश्री ग.गो.जाधव ( पुढारी) बाळासाहेब ठाकरे ( मार्मिक व सामना) अनंत भालेराव ( मराठवाडा), मुरलीधर शिंगाटे ( मुंबई चौफेर व पुण्यनगरी), अनंत दीक्षित ( सकाळ), निखिल वागळे ( आय बी एन लोकमत) या सर्वांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने समाज प्रबोधन व समाजातील अनिष्ट व्यवस्था व कामचुकारपणा यावर आपल्या लेखनातून आसूड ओढले.समाज प्रबोधन व विकासाची गंगा सर्व सामान्यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.*
*समाजाभिमुख कामे, पुरोगामी ध्येयधोरणे,अनिष्ट प्रथा, स्थानिक प्रश्न, मूलभूत व पायाभूत सुविधा, मराठी माणसाचे भवितव्य व भविष्य याची चिंता , बेरोजगारी, झोपडपट्टीतील समस्या, उड्डानपूल , स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती लढा,गोवा मुक्ती , महिला , दलित व मजूर यांच्या बाबतीत नेतृत्व यांच्या पत्रकारितेतून प्रभावीपणे केले.राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक , स्थानिक विकास व क्रीडा या विषयावर जबरदस्त प्रहार करून होणाऱ्या चळवळीत कायमच या पत्रकारांनी समाजाचे कायमच नेतृत्व केले व समाजाला समस्या मुक्त करण्याचा प्रयत्न केला*
*वरील पैकी निखिल वागळे हे इलेक्ट्रॉनिक माध्यम क्षेत्राचे प्रतिनिधी . विचारधारेशी प्रमाणिक ,सर्व सामान्यांच्या प्रश्नांशी थेट भिडणारा बाणेदारपणा , निर्भिड वृत्ती यामुळे पत्रकार समाजमनावर राज्य करु शकतो.तोल गेलेल्यांना जाग्यावर आणण्याचे काम कसे करावे ? हे सोशल मिडिया वर पत्रकारांनी दाखवून दिले.*
*महाराष्ट्राला जशी समृद्ध संत परंपरा आहे तशीच शौर्याची परंपरा आहे.पत्रकारांची सजग परंपरा म्हणजे महाराष्ट्रासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक सकारात्मक बदलासाठी परिसस्पर्श ठरला आहे.*
*महाराष्ट्रात पत्रकारितेचा समृद्ध वारसा असला तरी पत्रकारांनी जीवावर उदार होऊन करोनात केलेले काम डोनेशन पेक्षा डिव्होशन श्रेष्ठ आहे हे सिद्ध करते. पत्रकारितेचे स्वरूप भदलले तरी मूल्ये मात्र कायम राहणार आहेत.*
*सद्यस्थितीत खरे बोलण्यापेक्षा बरे बोलावे लागते.मार्केटिंगचा जमाना सुरू आहे.वैचारीक आणि राजकीय पातळीवर विविध गट निर्माण झाले आहेत. प्रबोधनाचे साधन ते मार्कैटिंगचे माध्यम असं वर्तमानपत्राचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पेंड न्यूज हा नवा प्रकार आला आहे. अब्रुनुकसानिच्या दाव्याची भिती आता सार्वत्रिक झाली आहे.सुट्ट्या अनियमित, पगार‌ कमी , नोकरीच्या ठिकाणी सोयी सुविधा अभाव ,नोकरीची शाश्वती यामध्ये पत्रकार अडकला असला तरी डेटा जर्नालिझम आणि बातमीतील वस्तुनिष्ठता हरवणार नाही याची काळजी घेताना पत्रकार व‌ संपादक यांना तारेवरची कसरत करावी लागते.प्रिन्ट, रेडिओ, टीव्ही , डिजिटल , पॉडकास्ट अशी अनेक माध्यमे आली आणि येत आहेत ,येत राहतील पण बदलणार नाही तो ” कन्टेन्ट “यांची पूर्ण जाण असणारा पत्रकार हा आत्ताच्या पत्रकारितेचा पाया आहे*
*आशावाद हा की माहिती – तंत्रज्ञानाच्या विस्फोटात पत्रकारितेमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत.पत्रकार स्वतः युट्यूब व वेबसाइट सुरू करता येते.*
*पत्रकार हा सध्या लोकशाहीचा चौथा स्तंभ बनला आहे असं नव्हे तर तो आपल्या कार्यकर्तृत्वाने बनविला आहे.हा चौथा स्तंभ निश्चितच समाजपरिवर्तन घडवेल.देशाला संपन्न भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावेल हा सार्थ विश्वास वाटतो.

महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहु महाराज यांचे समाजकार्य पत्रकारांच्या तोडीचेच आहे हे विसरता येणार नाही.*] *जीवावर उदार होऊन निरिच्छपणे, निष्कामपणे व समर्पित भावनेने काम करणाऱ्या मा संपादक , पत्रकार ,सोशल मिडिया यांना पत्रकार दिनानिमित्त मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा*
संपत गायकवाड ( माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!