ताज्या घडामोडी

चिकुर्डे गावच्या पश्चिमेला ,ठाणापुडे शिवारात गव्यांचे दर्शन दिल्याने घबराट

Spread the love

आज सकाळी सहाच्या दरम्यान चिकुर्डे गावच्या पश्चिमेला विठ्ठल बिरूदेवाच्या पाठीमागं ठाणापुढे शिवारात गव्यांचे दर्शन दिल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या मध्ये भितीचा आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व चिकुर्डे परिसरातील आणि ठाणा पूर परिसरातील लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

याची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी वन विभागाशी संपर्क साधला असून लोकांच्या सुरक्षिततेसाठी पीएसआय दीपक जाधव आपल्या स्टॉप सह ठाणापुढे आणि चिकुर्डे परिसरातील लोकांना सतर्क व दक्ष राहण्यासाठी सांगत असून लोकांनी शेतात कामाला जात असताना व शेतामध्ये ऊसात काम करत असताना जागरूक व सावध राहावं असावं दीपक जाधव यांनी शेतकरी व सर्व लोकांना आव्हान केला असून जर कोणाला गवा दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा आम्ही वन विभागाच्या साह्याने गव्याचा बंदोबस्त करू असे दीपक जाधव यांनी म्हटलेले आहे मात्र लोकांनी शेतात व अन्यत्र फिरत असताना आपली काळजी घ्यावी सावध दक्ष राहावं असा आवाहन कुरळप पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी नागरिकांना व लोकांना आव्हान केला असून वाळवा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी वनविभागानं तात्काळ या भगव्याचा बंदोबस्त करावा व शेतात काम करणाऱ्या शेतकरी शेतमजूर चिकुर्डे ठाणापुढे परिसरातील लोकांच्या सुरक्षितेसाठी प्रयत्न करून गव्याचा माग काढून वनविभागाने लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करावेत असे आव्हान प्रताप पाटील यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!