ताज्या घडामोडी

प्रभाव संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने करियरच्या वाटा एक दिवशी मार्गदर्शन शिबिर संपन्न

Spread the love

तुमच्या समोरील ध्येय निश्चित करून वाटचाल करा यश नक्की मिळेल.
– मा. मुख्याध्यापक भास्कर कदम (समुपदेशक)

सह्याद्री शिक्षण संस्थेत, सावर्डे येथे पदवी – पदव्युत्तर गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था आहे तुम्ही या उच्च शिक्षण घ्या जागतिकीकरणात सुद्धा संधी उपलब्ध आहेत”
– सहा. प्रा. पी. आर तांबे, एम. बि. कॉलेज, सावर्डे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हेड (एज्युकेशनल कौन्सेलर)

ता. २६ एप्रिल
प्रभाव संघ, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या वतीने शाळा , महाविद्यालये विद्यार्थ्यांना ( १०, १२, पदवीधर, पदव्युत्तर ) पुढील करियरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात किंबहुना विद्यार्थी पालकांपर्यंत भविष्यातील संधी यासंदर्भात योग्य माहिती पोहचावी याकरिता आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपली शैक्षणिक अहर्ता पूर्ण केल्यानंतर पुढील भवितव्या बाबतच्या वाटा शोधण्या साठी एक दिवशी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. पहिल्यांदाच करियरच्या वाटा हा आगळावेगळा मार्गदर्शन सोहळा कविता विनोद सराफ हायस्कूल, लोटे येथे संपन्न झाला, या कार्यक्रमात मा. मुख्याध्यापक श्री. भास्कर कदम सर समुपदेशक तसेच, सहा. प्रा. पी. आर. तांबे एज्युकेशन कौन्सेलर यांनी मार्गदर्शन केले.
दहावी नंतर काय? बारावी नंतर काय? डिग्री नंतर काय? कोणता कोर्स करू ?
काय कुठे स्कोप आहे ? अश्या विविध प्रकारच्या प्रश्नांची अचूक उत्तरे आणि मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
मा. श्री. ई.बा. जाकरवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
प्रभाव संघ, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रविण साळुंखे व सचिव श्री. ओंकार जव्हेरी मुख्य संघटक श्री. सागर महाडिक, यांनी आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शनाचा अभाव राहणार नाही आम्ही प्रभाव संघ कायम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी आवश्यक प्रयत्न करत राहू असे सांगण्यात आले. विविध प्रकारच्या सीईटी परीक्षा मार्गदर्शन करणारे तज्ञ मंडळी आपल्याला आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करतील अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. लवकरच प्रभाव संघ कौन्सिलिंग सेंटर साठी व्यवस्था निर्माण करत आहे त्यातून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल असे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर आदर्श व्यक्तिमत्त्व ठेवून वाटचाल करा ध्येय गाठणे सोपे होईल असे अध्यक्षीय भाषणात मा. ई.बा. जाकरवार साहेब यांनी सांगितले. करियरच्या वाटा या कार्यक्रमात अण्णासाहेब बेहरे कॉलेज लवेल आणि कविता विनोद सराफ हायस्कूल लोटे या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. एकूणच २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक मा. श्री. प्रविण साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे कविता विनोद सराफ हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. बसवंत सर, मा. भोकरे सर, माजी मुख्याध्यापक मा. जाधव सर, मा. लोखंडे सर आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थीत होते.
सचिव ओंकार जव्हेरी, सदस्य विजय बकवे, प्रसाद पवार, रोहीत भिसे व प्रभा व चे सर्व पदाधिकारी आणि सभासद हितचिंतकांची हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!