ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी माजी सभापती शैलेंद्र सुर्यवंशी (साखराळे) यांची निवड

Spread the love

इस्लामपूर दि.२९ प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी माजी सभापती शैलेंद्र सुर्यवंशी (साखराळे) यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी तालुका ध्यक्ष शैलेंद्र सुर्यवंशी यांच्यासह तालुका कार्यकारिणी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष,राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पक्ष संघटना व सामाजिक न्याय विभाग अधिक बळकट करण्यासाठी काम करावे,असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.
इस्लामपूर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयु.सुर्यवंशी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,राज्यचिटणीस अँड.चिमण डांगे यांच्या हस्ते निवड पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, शहराध्यक्ष शहाजी पाटील,खंडेराव जाधव, सुभाषराव सुर्यवंशी,शंकरराव चव्हाण,आयुब हवलदार,गोपाळ नागे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
नूतन तालुका कार्यकारिणी-कार्याध्यक्ष- दीपक कांबळे कार्वे, उपाध्यक्ष- सुभाष माने कासेगाव,रणजित कांबळे,सरचिटणीस- सचिन कांबळे रेठरे हरणाक्ष,सहचिटणीस- विवेक धनवडे वाळवा,खजिनदार-दिनेश जाधव वाटेगाव, सहखजिनदार-दीपक शिंदे आष्टा,प्रकाश कांबळे चिकुर्डे,सहचिटणीस- विनय बनसोडे भडकंबे,सदस्य-अरुण सावंत बहे,दीपक भंडारे,जितेंद्र आष्टेकर आष्टा,
बंडेश ऐवळे मिरजवाडी,वंदना कांबळे करंजवडे.
“ना.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून समाजात काम करीत आहोत. ना.जयंतराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्यावर दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडून नेतृत्व व पक्षाचा विश्वास सार्थ करू,”अशी ग्वाही नूतन तालुकाध्यक्ष आयु.शैलेंद्र सुर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी दिली.इस्लामपूर येथे माजी सभापती शैलेंद्र सुर्यवंशी यांना निवडीचे पत्र सुपूर्द करताना तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, अँड.चिमणभाऊ डांगे. समवेत अरुण कांबळे, शहाजी पाटील,खंडेराव जाधव,आयुब हवलदार,गोपाळ नागे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!