महाराष्ट्र

इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी )च्या कर्मचाऱ्यांनी  जागतिक तंबाखू विरोधी दिना निमीत्त घेतली शपथ

Spread the love

आवाज न्यूज

तळेगाव :- इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी ) महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून तंबाखू सेवन करणार नाही आणि इतरांनाही तंबाखू खाण्यापासून परावृत्त करू अशी शपथ घेतली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. जैन यांनी दिली.

जागतिक तंबाखू विरोधी दिनाची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यू एच ओ) वतीने ३१ मे १९८७ साली करण्यात आली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून होणारे रोग’ या संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.तंबाखूला निकोटियाना प्रजातीच्या वनस्पतीच्या पानांपासून बनविण्यात येते. तंबाखूचे पीक जगभरात उपलब्ध असून त्याला उत्तम मागणी आहे. निकोटीन हा तंबाखूमधील एक प्रमुख घटक असतो. तंबाखूच्या सेवनाने तोंडाचा कर्करोग होतो आणि यामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडतात. यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी, तंबाखूच्या दुष्परिणामांची दाहकता यानिमित्ताने लोकांपर्यंत पोचवणे हा
जागतिक तंबाख विरोधी टिन साजरा करण्यामागील मख्य उद्देश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!