ताज्या घडामोडी

अंबवडे गाव येथील द हॅपी क्लासरूम शाळेचा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार

Spread the love

 MSP Foundation ( एमसपी फौंडेशन, मुंबई) यांच्या माध्यमातून अंबवडे गाव, खटाव तालुका सातारा जिल्हा याठिकाणी THE HAPPY CLASSROOM ( द हॅपी क्लासरूम) शाळेचा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेळे नृत्य आणि नाटक सादर केले. तसेच प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सर्व सहभागी विद्यार्त्यांचा गौरव करण्यात आला तसेच सर्व पालकांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. मायप्पा बुधे सर, सेक्रेटरी -संदिप वावरे सर,खजिनदार सौ.पूनम बुधे-वावरे मॅडम आणि संस्थेचे वर्ष २०२२-२३ चे अध्यक्ष श्री. आबसाहेब देशमुख, उपाध्यक्ष- काशीनाथ बुधे, सचिव श्री. विश्वजीत घाडगे आणि सर्व सन्मानीय संचालक व पालक यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तानाजी सुखदेव कांबळे. ( विभाग प्रमुख – इंग्लिश, शहाजीराजे महाविद्यालय, खटाव), सौ. सारीका पवार- सरपंच आंबवडे, श्री. राजेंद्र जाधव (चेरमन- विकास सेवा सोसायटी) आणि अनेक मान्यवर पाहुणे उपास्थित होते. तसेच संभाजी देसाई सर व राहूल कोळी यांनी सूत्रसंचलन केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतिल शिक्षिका सौ. कुलकर्णी मॅडम, सौ. पवार मॅडम आणि सौ. तुपे मॅडम व सर्व सन्माननीय संचालक यांनी परिश्रम घेतले.
येणाऱ्या काळात या संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!