ताज्या घडामोडी

भागशाळा वाटद खंडाळा येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न

Spread the love

वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा खंडाळा व श्रीम. पा. शं बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथे *भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस* *वाचन प्रेरणा दिन* म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त प्रशालेत श्री. मगर, सौ. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धा घेण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. देशमुख, श्री. जगताप यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्री. सुनिल कांबळे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून स्पष्ट केले. मुख्याध्यापक श्री. देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एस. के. जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री. सरगर, सौ. गावडे, सौ. खेडेकर आणि श्रीम. चावरे तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!