ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या एकदिवसीय काम बंद आंदोलनाची शासनाकडून दखल

Spread the love

महाराष्ट्र समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवार दि.16 जानेवारी रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय काम बंद आंदोलन केले.या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील आरोग्य सेवा कोलमडली.याची दखल प्रशासनाने घेऊन आज बुधवार दि.18 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या पदाधिकार्यांना मंत्रालयामधे चर्चेसाठी पाचारण करण्यात आले होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियान चे सह आयुक्त डॉ.विजय कांदेवाड यांनी समुदाय आरोग्य अधिकार्यांनी 5%पगारवाढ,आंतरजिल्हा बदली,पतीपत्नी एकत्रिकरण,सेवेमधे कायम करणे या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली.येत्या 15 दिवसामधे या मागण्यांवर योग्य तोडगा काढू असे आश्वासन दिले.तसेच याचे लिखित स्वरुपात मिनीट्स देण्यात आले.
या भेटीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान चे सह आयुक्त डॉ.विजय कांदेवाड,आयुक्त डॉ.धीरजकुमार,महाराष्ट्र समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.संग्राम शिंदे,राज्य महासचिव श्री.अश्रफ अली शेख,उपाध्यक्ष श्री.अजित अहिरकर,राज्य सल्लागार धुळे डॉ.प्रकाश मोरे,राज्य सल्लागार वर्धा डॉ.संदीप लेकुरवाळे आणि सर्व जिल्यांमधील 15 ते 20 पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!