ताज्या घडामोडी
वशी येथे मुख्याध्यापक मंगल पाटील यांचा सत्कार.
शिराळा प्रतिनिधी / वशी (ता. वाळवा) येथे मुख्याध्यापक मंगल सयाजीराव पाटील यांचा सेवानिवृत्तीबद्दल सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते सत्कार झाला. त्या इस्लामपूर येथील विद्या मंदिर प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यांचा मुलगा रोहन सयाजीराव पाटील हे रशियाहुन एम. बी. बी. एस. ही पदवी मिळवून आल्याबद्दल त्यांचाही सत्कार जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्री. नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रशांत पाटील, सुखदेव माने, जगनाथ पाटील, आर. टी. पाटील, आनंदराव पाटील, डॉ. एम आर. बच्चे, लालासो मेथे, बी. आर. पाटील तसेच ग्रामस्थ, महिला, युवक उपस्थित होते.