बहादूरवाडी येथे अभिष्टचिंतन,विकास कामांचा शुभारंभ,नूतन संचालकांचा सत्कार सम्पन्न
बहादूरवाडी येथे अभिष्टचिंतन,विकास कामांचा शुभारंभ,नूतन संचालकांचा सत्कार सम्पन्न. शिराळा प्रतिनिधी / बहादूरवाडी (ता. वाळवा) : येथे काल (ता. २८) रोजी . बाजीराव दत्ताजीराव जाधव (काका) यांचा ७५ वा अभिष्टचिंतन सोहळा, विकास कामाचा शुभारंभ व विकास सोसायटीचे नूतन संचालकांचा सत्कार असा कार्यक्रम पार पडला. त्यास राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. मंत्री पाटील व आमदार नाईक यांनी सौ. व श्री. बाजीराव जाधव यांचा अमृतमहोत्सवी सत्कार केला. विकास सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ झाला. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, वाळवा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय पाटील, वाळवा तालुका संजय गांधी अध्यक्ष संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य संघटक भीमराव पाटील, कणेगावचे सरपंच वकील विश्वासराव पाटील, वारणा कारखाना संचालक किशोर पाटील, माजी पं. स. सदस्य बाजीराव बेनाडे-पाटील, माजी सरपंच विलासराव देसावळे, सरपंच नंदाताई शिंगे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, मंगेश माने, धनाजी जाधव, विश्वजित जाधव, विजयकुमार जाधव, सर्जेराव बेनाडे, भीमराव देसावळे, एकनाथ पाटील, अजित बेनाडे, गोविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.