ताज्या घडामोडी

शिराळा नगरपंचायत मार्फत शहरातील धन्वन्तरींचा सन्मान

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / आपले अवघे आयुष्य जनसेवेसाठी अर्पिणाऱ्या, आपल्या अथक प्रयत्नातून लहान मोठा गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता शर्थीच्या प्रयत्नातून प्रत्येक जीव निरीगी व सुदृढ राहावा या साठी सदैव प्रयत्नशील राहणाऱ्या माणसातल्या देवाला सलाम करण्याच्या, त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा, त्यांच्या या समाजोपयोगी कार्याचा अथोचीत सन्मान करण्याचा व त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रांजळ प्रयत्न आज शिराळा नगरपंचायत कार्यालयामार्फत आज करण्यात आला. सदैवच आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवेत स्वत:ला वाहून घेतलेले, व विशेषकरून मागील दोन वर्षापासून जागतिक महामारी म्हणजेच कोरोना( कोव्हीड १९) चा कर्दनकाळ ठरून या आक्राळ विक्राळ राक्षसापासून शहराला सुरक्षित ठेवणाऱ्या शहरातील सर्व डॉक्टरांचा १ जुलै जागतिक डॉक्टर दिनाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ०८/०८/२०२२ रोजी दुपारी ४:०० वाजता शिराळा नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. शिराळा नगरपंचायत चे मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी योगेश पाटील साहेब यांनी सर्व डॉक्टर वर्गाने कोरोना काळात नगरपंचायत कार्यालयाशी योग्य समन्वय साधून शहरातील कोरोना पोसिटीव्ह रुग्णाला कोरोना मुक्त करण्याचा व शिराळा शहराला सुरक्षित ठेवण्याचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले या शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला. नगरपंचायत कार्यालयामार्फत शहरातील सर्व डॉक्टरांना गुलाब पुष्प व गौरव पत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या सत्कारमूर्ती पैकी साईनाथ पाटील, डॉ. प्रदिप काकडे, डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. सर्जेराव कुरणे यांनी शिराळा नगर पंचायत मार्फत आयोजित करण्यात आलेला हा त्यांच्या सेवाकाळातील पहिलाच कौतूक सोहळा असल्याची भावना व्यक्त करत नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या कार्यकाळातील त्यांचा कार्याचा गौरव केला तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या कामाचेहि कौतुक केले. व डॉक्टर म्हणजे देव नसून सर्वतोपरी रुग्णसेवेसाठी प्रयत्न करणारा माणूसच आहे. त्यामुळे तो हि कुठेतरी कमी पडू शकतो अशी मानसिकता समाजानेही ठेवावी अशी आशा आपल्या मनोगतांत उपस्थितानि व्यक्त केली. यावेळी सन्मान सोहळ्यास शिराळा नगरपंचायत कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!