ताज्या घडामोडी

कोळीसरे शाळेतील श्रुती सावंत हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

Spread the love

जाकादेवी / वार्ताहर:-
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळीसरे बौध्दवाडी येथील इ.५ वी तील विद्यार्थीनी कु. श्रुती अनिल सावंत हिची यावर्षी जवाहर नवोदय विद्यालय साठी निवड झाली आहे.
जवाहर नवोदय विद्यालय निवडीबद्दल कु. श्रुतीचे शिक्षण विभागातून अभिनंदन होत आहे. श्रुती सावंत हिला शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री.अण्णा गाटे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.श्रुती सावंत हिने बी.डी.एस.स्पर्धेत इ.तिसरीमध्ये ब्रांझ मेडल पटकावले होते.खेळ खेळणे व अभ्यास करणे या दोन्ही क्षेत्रात तिला चांगली गती आहे.
कु. श्रुती सावंत हिचे खालगाव बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ.सशाली मोहिते,ओरी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे, आगरनरळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री राजीव दर्डी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.सिध्दी सावंत पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!