ताज्या घडामोडी

चेंबूरमध्ये २५ आणि २६ फेब्रुवारीला रंगणार मराठी साहित्य संमेलन

Spread the love

मुंबई – मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि आचार्य-मराठे महाविद्यालयाच्यावतीने उद्या शनिवार २५ आणि रविवार २६ फेब्रुवारी रोजी असे दोन दिवसीय मराठी साहित्य संमेलन २०२३ आयोजित करण्यात आले आहे.

चेंबूरमधील आचार्य- मराठे महाविद्यालयात होणार्‍या या संमेलनाचे पहिले सत्र शनिवारी दुपारी ३ ते संध्याकाळी ७.३० आणि दुसरे सत्र रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत चालणार आहे.यामध्ये कविवर्य अशोक नायगावकर यांचे नायगावकरी किस्से, डॉ. उन्मेष करमरकर यांचा कंबोडिया देशातील प्राचीन मंदिरावर आधारित ‘ स्लाईड शो’,प्रसिद्ध कवी रमेश तांबे यांचा ‘जन्म म्हणीचा ‘ रंजक कार्यक्रम,दिग्दर्शक-अभिनेता
मंगेश कदम,लीना भागवत यांची अभिनेत्री शीतल कुलकर्णी या मुलाखत घेणार आहे. तसेच पहिल्या दिवशी आचार्य-मराठे महाविद्यालयाच्या ‘कलारंग ‘ तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला जाणार आहे.तरी या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असुन सर्व साहित्य प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी साहित्य रसिक मंडळाच्या संस्थापक सदस्य आणि चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!