ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आमचं टार्गेट “फक्त पक्ष  बांधणी”. राष्ट्रवादी अध्यक्ष. शरद पवार.

आम्ही "न्यायालयात" जाणार नाही जनतेत जाणार.

Spread the love
आमचं टार्गेट “फक्त पक्ष  बांधणी”. राष्ट्रवादी अध्यक्ष. शरद पवार. आम्ही न्यायालयात जाणार नाही जनतेत जाणार.Our target is “Party Building Only”. NCP President. Sharad Pawar We will not go to court, go to the public

आवाज न्यूज : विशेष वार्ताहर, २ जुलै.

आम्ही न्यायालयात जाणार नाही जनतेत जाणार.गेले त्यांची चिंता नाही त्यांच्या भविष्याची चिंता असे उद्गार शरद पवार यांनी पञकार परिषदेत काढले.
 “माझ्यासाठी हे नवीन नाही, माझा जनतेवर विश्वास”  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी अजित पवारांच्या बंडानंतर पक्षाच्या भविष्याबाबत भाष्य केले. पवार म्हणाले, आजचा प्रकार इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. मला आठवतंय की १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृ्त्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते.

एक महिन्यानंतर त्या ५८ पैकी ६ सोडले सगळे माझा पक्ष सोडून गेलो. मी ५८ जणांचा विरोधी पक्षनेता होतो. पण त्यानंतर मी पाचच लोकांचा नेता राहिलो. मी ५ लोकांना घेऊन पक्ष बांधायला  महाराष्ट्रात निघालो. त्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक झाली त्यात दिसलं की आमची संख्या ६९ वर गेली म्हणजे संख्या वाढली गेल्याचं पवारांनी सांगितलं.
अजित पवारांनी बंड केल्याचे पवारांनी मान्य केले.तसेच आधी जे पक्षातून बाहेर गेले ते पुन्हा निवडून आले नाही.अजित पवारांबरोबर गेलेले काही सहकारी माझ्या संपर्कात आहेत,  अजित पवार यांची कोणतीही चर्चा झालेली नाही. ईडी चौकशी मध्ये काही आमदार अस्वस्थ होते, याचीही खदखद व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!