गटशिक्षणाधिकारी राऊत यांच्या विविध शाळांना भेटी
विद्यार्धी प्रगतीचा घेतला आढावा.
माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. माणिक राऊत साहेब यांनी गोंदवले केंद्रातील वाघमोडेवाडी व कचरेवाडी शाळेस अचानक भेटी दिल्या. सोबत घरोघरी शाळा उपक्रमाचे निर्माते व शिक्षण समृद्धी त्रेमासिक संपादक मंडळ सदस्य मा.श्री. संजय खरात होते.
भेटीदरम्यान साहेबांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षकांशी संवाद साधून दैनंदिन कामकाजातील शिक्षकांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच शासनाचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्याविषयी मार्गदर्शन केले.
संजय खरात यांनी वाचन-लेखन तसेच गणितीय उपक्रमाबद्दल शिक्क्षकांना मार्गदर्शन केले. वाघमोडेवाडीचे शिक्षक श्री.विनायक पालसांडे यांनी साहेबांना शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती सांगितली. कचरेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका कट्टे मॅडम तसेच उपशिक्षिका जगदाळे मॅडम यांनी पाढे पाठांतर उपक्रमाविषयी माहिती दिली.
भेटीदरम्यान साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शाळा विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील राहील असे आश्वासन दोन्ही शाळेतील शिक्षकांनी दिले.