ताज्या घडामोडी

पावस येथे जखमी शिक्रा (शिकारी) पक्षाला जीवदान

Spread the love

पावस :–रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील श्री.काटे व्ही.बी. यांच्या घरासमोरील अंगणामध्ये (शिकारी) शिक्रा पक्षावर आघात झाल्यामुळे जखमी अवस्थेत पडलेला होता त्याच्यावरती मांजरे व कुत्र्यांचा हल्ला होत होता या हल्ल्यातून त्याला श्री.काटे सर व त्यांचा मुलगा विश्वजीत काटे व पत्नी सौ.सविता काटे यांनी प्राण्यांच्या हल्ल्यातून त्याला वाचविले व जखमी अवस्थेत पडलेल्या या शिखरा पक्षाला योग्य ते त्याच्यावरती उपचार केले. भयभीत झालेल्या या शिखरा पक्षाला त्याला वेळच्यावेळी पाणी खाऊ देऊन रात्रभर घरामध्ये ठेऊन योग्य ती काळजी घेतली.हा पक्षी अतिशय वेगवान गतीने विहार करत असतो त्याची तीक्ष्ण नजर बाकदार चोच आणि धारदार नक्या यांची नैसर्गिक देणगी मिळालेला शिक्रा पक्षी सरडे,सापसुरळ्या, खारी, पक्षी यांचे शिकार करतो तसेच रत्नागिरीतील पक्षी मित्रांची संधान साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११ वाजता श्री सौरभ चव्हाण घरी आले व त्या शिखरा ( शिकारी )पक्षाला घेऊन पक्षी मित्राकडे जाणार होते. साडे अकराच्या दरम्यान या पक्षाला पाणी पाजण्यात आले आणि पक्षाची विषय माहिती चर्चा करत असताना अचानक या पक्षाने पंख विस्तारून एकच जबरदस्त मोठी सुळकी घेतली आणि नारळाच्या झाडावरती जाऊन विसावला. थोडा वेळ त्याची वाट पाहिली त्याची अवस्था पाहिली पण काही वेळाने त्याने अवकाशात झेप घेतली निघुन गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!