ताज्या घडामोडी

गुहागरात रंगला जुन्या पेन्शन संघटनेचा जागर”

Spread the love

शासकीय कर्मचा-यांनी रक्तदान करून केले अनोखे आंदोलन

गुहागर( विशेष प्रतिनिधी)

राज्य शासनाच्या नव्या पेन्शन योजनेला विरोध करून जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत सर्व विभागांतील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी अनोख्या आंदोलनाचा पवित्रा घेतला गुहागरात भंडारी भवन सभागृहात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त” करू जागर पेन्शनचा, करूनी रक्तदान” या उपक्रमांतर्गत भव्य पेन्शन जागर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी विविध विभागांतील शासकीय कर्मचाऱ्यांनी अवधुत राऊतराव व सहका-यांनी श्रद्धांजली गीत, देशभक्तीपर गीत, पेन्शन पोवाडा, ,भिमलेश वारके, पल्लवी काळे,निशिगंधा भुते,गौतम लोणारे,प्रभु हंबर्डे, बालाजी माणसिंगे,स्वरूप केळस्कर, बाबासाहेब राशिनकर, ईश्वर घनवटे अमोल धुमाळ व सहका-यांनी भीमगीते,पेन्शन गीते, भारूडे,सादर करून ईश्वर हलगरे,अनिलराजे शिंदे यांच्या पेन्शनवर आधारीत कविता सादर करून रसिकांची उस्फुर्त दाद मिळवली त्यांना संगीत साथ प्रशांत सावंत, संदेश हुमणे, अश्विन वाघमारे यांनी दिली १५० हुन अधिक अधिकारी कर्मचा-यांनी या शिबीरात रक्तदान केले.

जागर पेन्शनचा हे गित होतेय हिट..🖕

या पेन्शन जागर व रक्तदान शिबीराचे उद्घाटन गुहागरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.के जाधव, यांच्या शुभहस्ते व गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, गुहागर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जाधव, होमगार्डचे तालुका समादेशक सुधाकर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले जुनी पेन्शन संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अंकुश चांगण हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी विविध शासकीय कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व मान्यवरांची, गुहागर तालुक्यांसह जिल्हाभरातील सर्व विभागांतील शासकीय अधिकारी कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अमोल धुमाळ यांनी केले. सदर सोहळ्याचे सुत्रसंचालन सल्लागार बाबासाहेब राशिनकर व राज्य प्रतिनिधी दिपक साबळे यांनी तर आभारप्रदर्शन उपाध्यक्ष सागर भडंगे यांनी केले सदर कार्यक्रमाचे युट्युब व फेसबुक लाइव्ह केल्यामुळे राज्यभरातील हजारो कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात आपली ऑनलाईन उपस्थिती नोंदवत लाभ घेतला

पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे आणि तो राज्य घटनेने दिलेला आहे, या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम घेऊन तालुक्यासह जिल्हाभरातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांनी आपला पेन्शन हक्क अधोरेखित केला आहे. कार्यक्रमास राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुहागर तालुकाध्यक्ष अमोल धुमाळ, उपाध्यक्ष प्रदीप पडवाळ, सागर भडंगे,सचिव राहुल आमटे, कार्याध्यक्ष महेश आंधळे,कोषाध्यक्ष ईश्वर घनवटे, राज्य प्रतिनिधी दिपक साबळे, जिल्हा प्रतिनिधी शिवराम अंकुलगे, इमाम पाटील, जिल्हा महिला संघटक पल्लवी काळे, सल्लागार बाबासाहेब राशिनकर,डी.के राठोड,साजीद मुकादम, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर हलगरे, शिवाजी गायकवाड, संपर्क प्रमुख प्रभु हंबर्डे, शारिक अहमद, सहचिटणीस धनंजय डिसले, पांडुरंग फड, गणेश रोडे, जुनैद शेख, महिला प्रतिनिधी निशिगंधा भुते, प्रमुख प्रवक्ते अनिलराजे शिंदे, धनपालसिंग राजपुत, तालुका संघटक अजय खेराडे, भास्कर गावडे, बीट संघटक अवधूत राऊतराव, गणेश डुबे, नितीन खाडिलकर संजय राठोड व सर्व गुहागर तालुका कार्यकारणी व सदस्य मेहनत घेतली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!