ताज्या घडामोडी

राज्यव्यापी बेमुदत संपाचा दुसरा दिवस- अमळनेर कर्मचारी वर्गाचा जोरदार प्रतिसाद,एकवटल्या सर्वच संघटना

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

आजच्या बेमुदत संपला कालसारखाच जोरदार प्रतिसाद मिळाला. आज विविध अधिकारी तथा संघटना पदाधिकारी यांनी संपाला सक्रिय पाठिंबा व प्रबोधन केलं यात अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वास पाटील साहेब, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रावसाहेब मांगो पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. पी डी धनगर साहेब, केंद्रप्रमुख श्री. दिलीपनाना सोनवणे महसूल विभागाचे श्री. सुरेश पाटील साहेब, MSEB वर्कर्स फेडरेशनचे सल्लागार श्री. पी वाय पाटील साहेब, सर्कल मंडलाधिकारी श्री. पुरुषोत्तम पाटील साहेब इत्यादींनी सक्रिय सहभाग तथा मार्गदर्शन केले सोबतच *माध्यमिक पतपेढीचे संचालक श्री. तुषार बोरसे, खाजगी प्राथमिकचे श्री. रणजित शिंदे, समता शिक्षक परिषदेचे श्री. बापूराव पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री. वाल्मिक मराठे पाटील, मुख्याध्याक संघाचे श्री. एम. ए. पाटील, पारोळा पतपेढीचे मा. चेअरमन श्री. राजेंद्र सोनवणे, जेष्ठ मार्गदर्शक श्री. सुनील मोरे, शिक्षक भारतीचे श्री. आर जे पाटील. श्री. आशिष पवार, श्री. आशिष शिंदे, श्री. योगेश नाना पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, प्रहार संघटनेचे श्री. सुधीर चौधरी, यांनी मनोगत व्यक्त करत पाठिंबा जाहीर केला सोबत श्रीम. प्रमिला मोरे व श्रीम. सविता अहिरे या महिला भगिनींनीही भावना व्यक्त करत सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला. एकंदरीत आजचा संपाचा दुसरा दिवस त्याच आवेशात जोशात पार पडला. वरून सूचना येईपर्यंत संप अटळ राहील. अजूनही अनेक जि प शाळा व इतर ठराविक माध्यमिक शाळा सुरु असल्याबाबत नाराजी व्यक्त झाली. *म्हणून आज संध्याकाळी पाच वाजता तालुक्यातील सर्व विभागातील संघटनांची बैठक तहसील कार्यालय येथे होणार आहे, तिथे पुन्हा एकदा तालुक्यातील सर्व जेष्ठ कर्मचारी बंधूना सर्व संघटना प्रतिनिधींमार्फत आवाहन करण्यात येईल, जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात सर्व शाळा/ कार्यालये बंद आहेत, म्हणून आपल्याही तालुक्यात 100% शाळा/ कार्यालये/ आस्थापना बंद व्हावीत हीच अपेक्षा व भावना लहान बंधू भगिनींची व सर्व संपकाऱ्यांची आपल्याकडून आहे. उद्यापासून आपलं सहकार्य मिळेल या अपेक्षेसह आजच्या दिवसाचे काही क्षणचित्रं…निवेदक-
अमळनेर तालुका सरकारी निमसरकारी संघटना समन्वय समिती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!