ताज्या घडामोडी

गवळी समाज संघटना आयोजित भव्य *हळदीकुंकू समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

विरार – विरार, नालासोपारा, वसई व नायगाव स्थित गवळी समाज संघटना आयोजित भव्य *हळदीकुंकू समारंभ सोहळा* *रविवार दिनांक २६ फेब्रुवारी* *सायंकाळी ५ वाजता सखुबाई* *भास्कर हॉल विरार* *पूर्व* येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला गवळी समाजातील स्थानिक महिलावर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्यदिव्य कार्यक्रमाला जवळपास ५५० च्या वरती महिलावर्ग व नागरिकांची उपस्थिती लाभली.

गवळी समाजातील नागरिकांना एकत्रित आणणे आणि समाज संघटित करून सामाजिक उत्कर्ष साधने हा प्रमुख उद्देश ठेवून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विपुल पोरे यांनी दिली.

या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक गवळी समाज्याचे नेते श्री सखाराम महाडिक यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी संघटनेला मार्गदर्शन केले आणि भविष्यात सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

ह्यासोबतच कार्यक्रमाला महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट या गवळी समाजातील शिखर संस्थेचे माजी विश्वस्त श्री विजय तटकरे आणि इतर मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

संघटनेने महिलांसाठी संगीत खुर्ची, होम मिनिस्टर आणि लकी ड्रॉ चे या खेळांचे आयोजन केले होते आणि त्याला सर्व महिलांनी तुफान प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली
प्रत्येक खेळामधून 3 विजेते घोषित करण्यात आले
विजेते खालील प्रमाणे

गवळी समाज संघटना

होम मिनिस्टर २०२३ विजेत्या
१. सेजल रिकामे
२. सुचिता काते
३. साक्षी खेडेकर

संगीत खुर्ची विजेत्या
१. शमीका सुरेंद्र किलजे
२. तनिष्का किशोर वाजे
३. दिव्या दिनेश कासार

लकी ड्रॉ विजेत्या
१. रिंकल नितेश बिरवाडकर
२. रुची विठोबा महाडीक
३. तनिष्का किशोर वाजे

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि भाग घेतलेल्या स्पर्धकांचे आभार

सदर कार्यक्रमाला कार्यकारणी आणि स्वयंसेवक यांनी खूप मेहनत घेऊन संघटनेचा महिलांसाठी घेतलेला पहिलाच कार्यक्रम मोठ्या उत्सहात पार पाडला.

एक संघटनेचे स्वप्न घेऊन जो प्रवास सुरु केला आहे तो योग्य दिशेने होत आहे ह्याच समाधान खूप मोठं आहे, ह्या कार्यक्रमाचे श्रेय हे सर्वस्वी आमचे प्रत्येक स्वयंसेवकांचे आहे ज्यांनी ह्यात अथक परिश्रम घेऊन खूप चांगल्या प्रकारे नियोजन केले.

हा उपक्रम पार पाडण्यासाठी संघटनेचे सचिव दिनू रिकामे सोबत कार्यकारणी विशाल रिकामे, विलास धुमाळ, सुशांत घोले, अविनाश काते, संतोष तटकरे, उमेश दर्गे , सचिन रिकामे, भावेश महाडिक, अभिनंदन नटे, चंद्रवदन महाडिक, सुदेश महाडिक, संतोष रिकामे, मुरलीधर काते, महेश रिकामे, विजू रिकामे, प्रकाश रिकामे, रुपेश महाडिक संदिप काते ,रुपेश काते, उमेश गायकर, राकेश कोदेरे,गणेश बिरवाटकर, संदिप कासार, मनोज पागार त्या सोबतच महिला नियोजन समितीच्या सौ. अस्मिता पोरे, सौ. विराणी धुमाळ, प्रिया रिकामे, रुची महाडिक,मैथिली महाडीक, नेहा महाडिक सोबत सर्व स्वयंसेवक इत्यादींनी आपले उपक्रमास वैयक्तिक हातभार लावून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!