आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

कोथुर्णेतील दुर्दैवी कु.स्वरा चांदेकर हिचे मारेक-यास फाशी झाली पाहिजे , या मागणीसाठी बजरंगदल व दुर्गा वाहिनीचे बेमुदत उपोषण…

मावळातील वारकऱ्यांचे वतीने उपोषणास पाठिंबा व शोकसभेत तीव्र भावना..

Spread the love

कोथुर्णेतील दुर्दैवी कु.स्वरा चांदेकर हिचे मारेक-यास फाशी झाली पाहिजे , या मागणीसाठी बजरंगदल व दुर्गा वाहिनीचे बेमुदत उपोषण

मावळातील वारकऱ्यांचे वतीने उपोषणास पाठिंबा व शोकसभेत तीव्र भावना..

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर पवनानगर ता.७ प्रतिनिधी.

पवनानगरला कोथुर्णेतील निष्पाप कु.स्वरा चांदेकर हिचे मारेक-यास फाशीची शिक्षा द्या , या मागणीसाठी पवनानगर बाजारपेठेत बजरंगदल व दुर्गा वाहिनीचे बेमुदत उपोषण ;मावळातील वारकऱ्यांनी पांठिंबा देवून निषेद करत शोकसभा घेताली. मारेक-यास फाशीची शिक्षा करा , असे लोणावळा ग्रामिण पोलिसांना निवेदन दिले. यावेळी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

आज सकाळी दहा वाजताच पवनानगर चौकात ओंकार दर्शन गणपती मंदिराजवळ मावळ तालुका बजरंगदल , दुर्गा वाहिनी यांचेकडून उपोषणास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी साडेदहा वाजता मावळ तालुका वारकरी समाजातर्फे उपोषणास पाठिंबा देण्यात आला.
यावेळी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय या़ंचेवतीने संस्थापक अध्यक्ष नंदकुमार भसे , सचिव रामदास पडवळ, कायदेशीर सल्लागार अॕड. सागर शेटे , पवनमावळ विभागप्रमुख गणपत पवार , श्री.विठ्ठल परिवार अध्यक्ष गणेशमहाराज जांभळे , तसेच बऊरचे सरपंच आदींच्यावतीने स्वरा चांदेकर हिचेवरील अमानुष बलात्कार व निर्घून खूनप्रकरणी आरोपीस तात्काळ फास्टट्रॕक न्यायलयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी , अशी मागणी करण्यात आली. निवेदनाची प्रत लोणावळा ग्रामिणचे सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश माने यांचेकडून स्विकारण्यात आले.

यावेळी पोलिसांकडून मंडप टाकण्यास परवानगी नाकारल्याने मावळ तालुका बजरंगदल व दुर्गा वाहीनी , यांचेकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. पोलिस अधिकारी श्री.माने यांचेतर्फे सांगण्यात आले , की बजरंगदल व मावळातील वारकरी हे एक आक्रमक संघटना व दुसरे शांत , मवाळ संघटना असे दोन -तीन संघटना एकञ असल्याने परवानगी नाकारली , पण दुपारी १ चे सुमारास सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री.माने यांचेकडून वरिष्ठांकडून परवानगी घेऊन मंडप टाकण्यास परवानगी दिल्याचे जाहीर केले.

आखिल भारतीय वारकरी मंडळ , तसेच मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठाण , महाराष्ट्र , विठु माऊली प्रतिष्ठाण , महाराष्ट्र माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ यांचेतर्फे या उपोषणास पाठिंबा देण्यात आला.तसे निवेदन सर्व संघटनेच्यावतीने देण्यात आले.
कोथुर्णे ग्रामपंचायतीचेवतीनेही पाठिंबा देण्याचा ठराव करण्यात आला.
श्री विठ्ठल परिवारातर्फे श्री.जांभळे महाराज यांचेकडून निवेदन देण्यात आले.आखिल भारतीय वारकरी मंडळांच्यावतीने तसेच मावळ तालुका वारकरी मंडळांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. तसेच सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश माने यांचेकडे मावळ तालुका वारकऱ्यांचेवतीने मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष नंदकुमार भसे , सचिव रामदास पडवळ , पवनमावळ विभागप्रमुख गणपत पवार तसेच मान्यवरांचे हस्ते निवेदन देण्यात आले.

एका महिला कार्यकर्तीने भाषणात सांगितले की ,
सात वर्षाच्या चिमुरडीचा नराधमाने बलात्कार करून बळी घेतला. ती घरात असताना , तिचे तोंडात कपड्याचा बोळा , आणि हात पाय बांधलेले , असताना , तिची आई अंगणवाडी सेविका असूनही स्वराच्या आईवडील यांचे घरी त्यांचे दुःख बघत बसली , त्यामुळे तिचे आईला सहआरोपी करून अटक केली आहे. पोलिसांचे कौतुक करावे , तितके कमी आहे. गुन्यातील दोघांनाही कठोरातील कठोर शिक्षा द्यावी , आरोपीला कोथुर्णे गावात , पवनानगरला सर्वांसमोर फाशी द्यावी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी महिला , व पुरूष वारकऱ्यांचेवतीने तसेच बजरंगदल आणि दुर्गा वाहीनीतर्फे यावेळी निवेदने देण्यात आली. यावेळी पवना धरणग्रस्त परिषदेचे सभासद व जेष्ठ वारकरी रविकांत रसाळ यांनी भाषणात आशा प्रकारचे निर्घून कृत्य करणाऱ्या अरोपीस फास्ट ट्रॕक न्यायालयाने खटला चालवून फाशीची शिक्षाच द्यावी , आशी मागणी केली.
यावेळी मावळ तालुक्यातील प्रवचनकार व कीर्तनकार ह.भ.प.तुषार महाराज दळवी , ह.भ.प.गोपीचंद महाराज कचरे , ह.भ.प. गणेशमहाराज जांभळे , ह.भ.प.महादुबुवा नवघणे तसेच पंचक्रोशितील मान्यवर उपस्थित होते.

.
यावेळी मावळ तालुका वारकरी सांप्रदायाचे शेकडो ग्रामप्रतिनिधी , विभागप्रमुख , तसेच तालुकाध्यक्ष देवराम सातकर , भिवाजी गायखे , रामदास काळे , युवराज पडवळ , भाऊसाहेब हुलावळे , तसेच कीर्तनकार तुषारमहाराज दळवी , वारकरी महामंडळ यांचे अध्यक्ष अनंता लालगुडे , आदी उपस्थित होते. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचेकडून बजरंगदल , दुर्गा वाहिनी , तसेच वारकरी समाज यांची भेट घेऊन पाठिंबा देण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख , पुणे महानगर नियोजन समितीचे शरद हुलावळे , आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या अलकाताई धानिवले , तसेच नितीन निंबळे , तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ सदस्य दत्ताञेय काजळे , म्हणाले , राज्य सरकारने स्वराला लवकरात लवकर न्याय देण्यासाठी कलमांत बदल करावा. तात्काळ फाशी द्या. पंचायत समिती माजी सभापती सुवर्णाताई कुंभार , वारकरी सांप्रदाय चे विभागप्रमुख संतोषमहाराज कुंभार यांचेकडून श्रध्दांजली वाहून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला; तर मावळ तालुका वारकऱ्यांचे वतीने निषेध व शोकसभा संपन्न झाली. अनेक स्थानिक महिलांचे व मुली यांचेकडून आरोपी , नराधम यास फाशीची शिक्षा द्यवी , ज्यामुळे मावळातच नाही महाराष्ट्रात याची जरब बसेल. काही वारकऱ्यांचेवतीने आरोपींची फाशीची शिक्षा देण्याआधी पवनानगर ते वडगाव तसेच कोथुर्णे अशी धिंड काढावी,अशी मागणी करण्यात आली. दुपारी पावसाच्या जोरदार सरी आल्या ;तरीही बजरंगदल व दुर्गा वाहीनी पदाधिकारी आणि वारकऱ्यांचे प्रतिनिधी जागेवरून हलले नाहीत. भाषणातून कार्यकर्ते या मोठ्या गंभीर घटनेमुळे मावळचेच नाही ;तर महाराष्ट्राचे नाव गेले , नाक कापले गेले आहे,त्यामुळे आरोपीला फाशी झालीच पाहिजे , असे लेखी आश्वासन मिळेपर्यत उपोषण सोडणार नाही , आसा पविञा घेण्यात आला. …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!