दत्तसेवा पतपेढीने सहकार, सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली:प्रा.मानकेश्वर दुबे
कोकरुड/ वार्ताहर
दत्तसेवा पतपेढीने सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले असल्याचे प्रतिपादन प्रा.माणकेश्वर दुबे यांनी केले ते मालाड पश्चिम मुंबई येथे संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित ३५ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संस्थेच्या सर्व शाखांमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी घेण्यात आला. यावेळी संस्थापक आनंदराव मांईंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना दुबे पुढे म्हणाले की संस्थेने गेल्या 34 वर्षात मुख्य कार्यालय व 18 शाखाद्वारे 415 कोटींचा संमिश्र व्यवसाय केला आहे.
संस्थेने छोटे ,मोठे व्यावसायिक यांना आथिॅक प्रगतीसाठी सहकार्य केले आहे.सभासदांचे हित जोपासत केलेली ही प्रगती निश्चितच अभिमानास्पद आहे. यामध्ये संस्थेचे कुशल संस्थापक आनंदराव मांईंगडे,संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. यावेळी गिरजाभाई यादव,राजु जैन, अविनाश देवडीकर , रावजी चौधरी, साहेबराव बडगुजर,भारती जाधव,अल्बर्ट चेट्टीयार,डेक्टर बॅरेटो आदींसह संचालक मंडळ, सभासद व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रांरभी प्रास्ताविक संस्थेचे मुख्य व्यवस्थापक हरी पाटील यांनी केले तर आभार प्रशासकीय अधिकारी उदय लुगडे यांनी मानले.