ताज्या घडामोडी

निवडे येथे आधारकार्ड नसलेल्या नागरिकांचं लसीकरण

Spread the love

पालकमंत्री कोविड लसीकरण प्रोत्साहन येजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामधे आत्तापर्यंत जवळपास 90% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे.
यामधे आधारकार्ड,पॅनकार्ड,रेशनकार्ड नसलेले,फिरस्ती,भटके आणि ऊसतोड मजूर आदी नागरिकांकडे शासकीय कागदपत्रांचा पुरावा नसलेने असे नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले होते.
कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर आरोग्य विभागाने या नागरिकांचं विना कागदपत्रे घेता लसीकरण करण्याचे आदेश दिले होते.
उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत जाधव यांनी निवडे गावामधील आधारकार्ड नसलेल्या नागरिकांना पहिला डोस देऊन त्यांचं लसीकरण करुन घेतलं.यावेळी उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत जाधव,आरोग्य सेवक संदीप पाटील,आशा स्वयंसेविका संगीता सुतार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!