ताज्या घडामोडी

सांगली करानी अस्सल हापूस आंबा महोत्सवास २०२२ ला उत्सफूर्त प्रतिसाद. मा. निळकंठ करे

Spread the love

जिल्हा उपनिबधंक सहकरी संस्था सांगली.उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर, व सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली च्या यांच्या सयुंक्त विदयमाने शुक्रवार दिनांक १३ मे २०२२ मे रोजी मा. निळकंठ करेसो – जिल्हा उपनिबधंक सहकारी संस्था सांगली व मा. अशोक वीरकर- उपअधिक्षक मिरज यांच्या शुभहस्ते पदमभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृतिभवन वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे आंबा महोत्सवास २०२२ चे उदघाटन स्व पदमभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून, व दिप प्रजवल्लन करून करणेत आले.

सदर उदघाटन कार्यक्रमास मा.मनोज कुमार वेताळ-जिल्हा कृषी अधिकारी सांगली, डॉ. वंसतराव जुगळे- संचालक अथणी शुगर, सौ. उर्मिला राजमाने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगली, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर चे उपसरव्यवस्थापक मा.डॉ.सुभाष घुले,बाजार समितीचे सचिव मा.महेश चव्हाण, मा पुंडलिक गडदे (तात्या) महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर चे, प्रसाद भुजबळ, व प्रतिक गोनुगडे व बाजार समितीचे आधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या उदघाटना प्रसंगी डॉ. सुभाष धुले यांनी आंबा उत्पादकांनी क्यू आर कोड सारख्या आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर करणे गरजेचे असलेचे मत व्यक्त केले तसेच मा.डॉ.जुगळे यांनी कोकणातील शेतक-यांचे आर्थिक चक्र हे आंबा या पिंकावर अवलबूंन असल्याने आंबा उत्पादक शेतक यांनी आशा आंबा महोत्सवास मोठया प्रमाणात सहभागी होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.

मा. निळकंठ करेसो – जिल्हा उपनिबधंक सहकारी संस्था सांगली यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ राबवित असलेल्या उत्पादक ते ग्राहक या थेट विक्री या योजनेचे कौतूक करून हापूस आंबा ग्रामीण भागापर्यंत या माध्यमातून पोहचला पहिजे असे सागिंतले मा.मनोजकूमार वेताळ जिल्हा कृषी अधिकारी सांगली यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ राबवित असलेल्या आंबा महोत्सव हा उपक्रम स्तुतीय योग असून कोकणातील आंबा उत्पादक शेतक-यांनी आशा आंबा महोत्सवा मध्ये मोठया प्रमाणात सहभागी होवून त्यांचा फायदा घ्यावा, तसेच सांगली शहरातील ग्राहकांनी या आंबा महोत्सवास प्रचंड प्रतिसाद दयावा असे आवाहान केले आहे.

सदरचा शुक्रवार आंबा महोत्सव दिनांक १३ मे २०२२ ते मंगळवार दिनांक १७ मे २०२२ अखेर (पाच दिवस) सकाळी ९ ते रात्री ८ वाजे पर्यत ग्राहकां साठी चालू राहणार आहे या आंबा महोत्सव मध्ये प्रामुख्याने असल्ल् हापूस, केशर, पायरी व बिटका आंबा या जातीचा आंबा वाजवी दरात ग्राहकांना उपलब्ध आहे शेवटी कार्यक्रमाचे आभार बाजार समितीचे सचिव मा.महेश चव्हाण यांनी केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!