ताज्या घडामोडी

शहरी व ग्रामीण भागातील तळागाळातील विकास हाच अजेंडा घेऊनच करतोय वाटचाल-आ.अनिल पाटील

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

नंदगाव येथे 53 लाखांच्या पाणीपुरवठा योजनेसह उल्लेखनीय विकासकामांचे भूमिपूजन

अमळनेर-मतदारसंघात विधानसभा सदस्य पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून कोरोना महामारी असो किंवा इतर राजकीय घडामोडी असो सतत काहिनाकाही संकटे येत असली तरी जनतेच्या आशीर्वादाने त्यावर मात करीत विकास हा एकमेव अजेंडा घेऊन वाटचाल करीत असल्याची भावना आ.अनिल भाईदास पाटील यांनी नंदगाव येथे 53.89 लक्ष ची पाणीपुरवठा योजना आणि विविध विकास कामाच्या प्रसंगी व्यक्त केली.
सदर कामांचे भूमिपूजन आमदारांसह जि.प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सुरवातीला ग्रामस्थांनी आमदारांसह जि प सदस्यांचे गावात आगमन होताच जल्लोषात स्वागत व सत्कार केला,यावेळी आमदार अनिल पाटील यांनी आपल्या मनोगतात मतदारसंघातील विकास कामांचा आढावा मांडत ज्या ज्या गावात जी आवश्यक कामे असतील ती पूर्णत्वास आणल्याशिवाय शांत बसणार नाही अशी ग्वाही दिली.याप्रसंगी सरपंच सुधाकर काशिनाथ पाटिल, मंगलाबाई सुधाकर पाटील, माजी सरपंच तासखेडा धावडेकर नाना, उपसरपंच सदाशिव यादव बडगुजर , बहिरम गुरुजी, माजी सरपंच रतन पाटील, मेष दत्तू पाटील, भास्कर दयाराम बडगुजर, बहिरम पाटील सर, पृथ्वीराज आप्पा पाटील, दामोदर पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महत्वपूर्ण पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न सोडविल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदारांसह जि प सदस्यांचे आभार व्यक्त केले.

या विकास कामांचे झाले भूमिपूजन

2515 योजने अंतर्गत राममंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे,रक्कम रु.7 लक्ष,जलजीवन मिशन योजणे अंतर्गत नंदगांव पाणी पुरवठा योजना रक्कम रु.53.89 लक्ष,जि.प स्तर शाळा खोली बांधकाम करणे रक्कम रु.8.50 लक्ष,जि.प.स्तर नंदगांव ते गांधली रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रक्कम रु.20 लक्ष,जि.प स्तर दलित वस्तीत समाज मंदिर बांधणे रक्कम रु.5 लक्ष,जि.प.स्तर दलित वस्तीत काँक्रीटीकरण करणे रक्कम रु.8 लक्ष,जि.प. स्तर पाईप मोरी बांधकाम करणे रक्कम रु.3 लक्ष.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!