ताज्या घडामोडी

कवी भारत कवितके यांच्या ”माझ्या गावाच्या दिशेने.. ”काव्यसंग्रहाचे प्रकाशन.

Spread the love

शनिवार दिनांक ११जून २०२२ रोजी कराड येथील सदाशिवगड येथे राज्यस्तरीय पहिले साहित्य संमेलनाचे आयोजन महादेव माने व श्लेषा कारंडे यांनीं केले आहे.शामराव जाधव,व संगिता जाधव या दापत्यांच्या ३१व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सदर साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून सुमारे १०० कवी कवयित्रीनी या साहित्य संमेलनातील काव्यसंमेलनात आपल्या कवीता सादर करण्याकरीता नोंद केली आहे.या साहित्य संमेलनासाठी कोणाकडूनही कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.पुरस्कार वितरण,कथाकथन, पुस्तके प्रकाशन, व काव्यसंमेलन आदि भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.याच साहित्य संमेलनात मुंबई कांदिवली पश्चिम, येथील मूळचे पंढरपूर चे रहिवाशी असलेले साहित्यिक व पत्रकार भारत कवितके यांच्या ” माझ्या गावाच्या दिशेने… ”या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन औरंगाबाद येथील शब्दगंध प्रकाशन यांनी केले आहे. भारत कवितके मुंबई यांचे हे सातवे पुस्तक आहे. साहित्य क्षेत्रात या काव्यसंग्रहाचे जोरदारपणे स्वागत होईल, असे श्लेषा कारंडे यांनीं सांगितले. सदर साहित्य संमेलन अध्यक्ष भगवानराव साळुंखे,प्रमुख पाहुणे नामदार बाळासाहेब पाटील, स्वागताध्यक्ष पंकज माने तर श्लेषा कारंडे व महादेव माने हे साहित्य संमेलनाचे आयोजक असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!