ताज्या घडामोडी

श्री. जंगम समाज बहुद्देशीय संस्था दुधनी तर्फे खा.डाॅ. जयसिध्देश्वर महाराज यांना निवेदन

Spread the love

दुधनी:- दुधनी हे गाव महाराष्ट्र व कर्नाटक सिमेवर असल्यामुळे कर्नाटकातील काही दोन तालुक्याचे प्रवाशी दुधनी या रेल्वे स्टेशनवरून प्रवास करीत असतात, तसेच दुधनी शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा व बाजारपेठ, बॅंका, नगरपालिका, तलाठी इ.सरकारी कार्यालये असल्यामुळे नागरिकांना दुधनीला ये-जा करावे लागतात.
त्यामुळे गाडी क्र. 22155 कलबुर्गी ते कोल्हापुर व गाडी क्र. 22156 कोल्हापुर ते कलबुर्गी नविन रेल्वे सुरू करण्यात आली आहे तसेच गाडी क्र. 17320 सिकंदराबाद ते हुबळी या दोन्ही गाड्यांना दुधनी रेल्वे स्थानकास थांबा देण्यात आली नाही म्हणून या गाडी दुधनी रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावी म्हणून सोलापूर चे खासदार डाॅ. जयसिध्देश्वर महाराज, रेल्वे राज्य मंञी रावसाहेब दानवे, डी. आर. एम कार्यालय सोलापूर, दुधनी रेल्वे स्टेशन मास्तर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जंगम समाज बहुद्देशीय संस्थाचे कार्याध्यक्ष गदगय्या मठपती, अध्यक्ष मलय्या हिरेमठ, ईरय्या ऊर्फ (बाबा) पुराणिक, गुरुपादय्या सालीमठ, महानिंगय्या बाहेरमठ आदी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!