ताज्या घडामोडी

शिराळा युवक संघटनेच्या २५ व्या रौप्यमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन..

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा युवक संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. यावर्षी शिराळा युवक संघटनेच्या २५ वा रौप्यमहोत्सव आहे. त्यामुळे रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून शिराळा शहरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी सरपंच देवेंद्र पाटील यांनी केले
देवेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा युवक संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून शहरासह तालुक्यात सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.
यावेळी पाटील म्हणाले, आता पर्यंत या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करणे, युवकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे व कॅरम स्पर्धेच्या आयोजनाबरोबरच कोरोना काळात संघटनेने रोगप्रतिकारक शक्तीवर्धक इम्युनिटी बुस्टर बॉटल्सचे मोफत वाटप केल्या आहेत. तसेच संघटनांच्या वतीने पूरग्रस्त कुटूंबांना जीवनावश्यक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ही केले आहे.
हे वर्ष आमच्या सर्वांच्या साठी आनंदाचे आहे. शिराळा युवक संघटनेचा २५ वा रौप्यमहोत्सव असल्याने संघटनेच्या वतीने २ मार्च ते ६ मार्च पर्यंत भव्य फुलस्पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पोलिस ग्राउंड शिराळा येथे केले आहे. तसेच कॅरम स्पर्धेचे हि आयोजन करण्यात येणार आहेत. येथुन पुढील काळात ही सामाजिक, शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात शिराळा युवक संघटना अग्रेसर राहिल असे प्रतिपादन देवेंद्र पाटील यांनी केले.
यावेळी लालासो तांबीट, प्रशांत कांबळे, रवि यादव, वैभव कुंभार, राहुल पवार, मंगेश कांबळे,विनोद घाडगे ,धर्मेंद्र आलेकर आसिफ काजी, तसेच संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!