ताज्या घडामोडी

शहर तसं चांगलं पण पाण्याविना टांगलं_ डॉ.डी.एस.काटे…

Spread the love

औरंगाबाद शहर ५२ दरवाजे असणारे ऐतिहासिक शहर !!

म्हणतात ना
*घराची कळा अंगण सांगते*
या म्हणीप्रमाणे
या दरवाजांच्या वैशिष्ट्यपूर्णते वरूनच औरंगाबादच्या भव्यतेची कल्पना येते असे,

इतिहास कालीन शहराभोवती असणाऱ्या जागतिक पर्यटन केंद्रामुळे औरंगाबादचा नावलौकीक वाढत आहे..

सर्व ऋतूत अल्हाददायक,
आरोग्यदायी स्वच्छ वातावरण असणारे शहर म्हणजे औरंगाबाद!!!

औद्योगिक नगरी म्हणून उद्योग वाढीसाठी सपाट जमीन त्याच बरोबर
उत्तर व दक्षिण भारतातील राज्यांना दळणवळणाने जोडणारे मुख्य केंद्र म्हणजे औरंगाबाद !!!

अशी सर्व वास्तविकता असताना शहराची दुर्दशा मात्र फक्त आणि फक्त
शहराला मिळणार्‍या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे झाली आहे.
आजही १५ लाखापर्यंत असलेल्या महानगराच्या लोकसंख्येला आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होतो ही खेदाची गोष्ट आहे.
पाणी हा दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
त्यामुळे या जीवन घटकाचा राहणीमान, जीवनशैली व कार्य शाली यावर मुख्यता फरक पडत असतो.

शहरातील महत्त्वाची समस्या म्हणजे
पाणीटंचाई तर आहेच त्याचबरोबर इतर अनेक समस्या सुद्धा शहरात जाणवत आहेत. शहरातील रस्ते व त्यावरील खड्डे पाहून याची प्रचिती येते.
*नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा*
या उक्तीप्रमाणे
घाईगडबडीने राबवण्यात आलेल्या समांतर पाणी योजना व भूमिगत गटार योजना पूर्णपणे अयशस्वी झालेल्या आहेत..

भविष्यात शहराचा
नगररचना आराखडा आगामी सोयीसुविधा नुसार दूरदृष्टीने बनवने आवश्यक आहे..
औरंगाबाद शहर हे मोठे राजकीय मेळावे त्याच बरोबर सभा ,
कॉर्पोरेट मीटिंग, नवीन उत्पादनाची सुरुवात अशा कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असून याचे मुख्य कारण म्हणजे भौगोलिक दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण, हॉटेल व्यवसायाची नाविन्यपूर्ण सुविधा व त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा चांगली प्रगती दिसून येत आहे..

पण शहराचे होणारे बकालीकरण आणि नागरिकांना मूलभूत सेवासुविधा पासून वंचित राहावे लागत असल्याने शहराचे नाव खराब होत आहे..

सेवा सुविधा विषयी दायित्व, पालकत्व स्विकारणार्‍या व्यक्तींची कमतरता येथे जाणवते आहे.

*माझे शहर -माझी जनता* हा ध्यास घेऊन सार्वजनिक हितासाठी व सुविधां साठी अग्रक्रमाने कोणीही पुढे येताना दिसत नाही, आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेक राजकीय पक्ष फक्त बेगडी प्रेम दाखवण्याचे प्रयत्न करताना जनतेस दिसत आहे…

राजकीय पक्षांनी युती व आघाडी करून अनेक वर्ष महापालिकेवर सत्ता भोगली.. पण

तेच आज वेगवेगळ्या पाणीटंचाई विषयी ओरड करत आहे ??
एकमेकास दोष देत आहेत ??
*आंधळा म्हणे तांगड तुट*,
*बहिरा म्हणे चांदवड लुट* या म्हणीप्रमाणे हा गदारोळ वाटतोय..

शहर विकास निधीचा योग्य वापर व अंमलबजावणी न
केल्यामुळे आज पाणीटंचाई, त्याचबरोबर मुख्य नागरी सुविधा यापासून नागरिक वंचित झाले आहे..

शहराभोवती दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणावर निर्मित होत आहे…

यामुळे अनेक उद्योग धंदे आकर्षित होऊन शहर विकासाला चांगली संधी आहे …

सामाजिक माध्यमे व प्रसार माध्यमे यावर प्रसिद्ध होणाऱ्या पाणीटंचाई व इतर सुविधां विषयी औरंगाबादच्या शहराच्या बातम्यांमुळे उद्योगधंदे सुद्धा संभ्रमावस्थेत असून औरंगाबादकडे येण्यासाठी द्विधा मनस्थितीत आहेत..

त्याचबरोबर स्मार्ट सिटी कडून मेट्रो सिटी कडे वाटचाल हवी असल्यास.. एक व्यवस्था परिवर्तन व सकारात्मक मानसिकता ठेवून सर्वांनी अशा सामाजिक प्रश्नाविषयी जागृती निर्माण करून त्याचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न निश्चित व्हायला हवा….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!