ताज्या घडामोडी

अरमान-अनिरुद्ध यांचे अनपेक्षित यश जेएमडीवायसी पिकलबॉल स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

मुंबई : अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (एआयपीए) मान्यतेने आणि जल मंगल दीप युथ क्लबच्या (जेएमडीवायसी) वतीने गोरेगाव येथील बांगुर नगर येथे झालेल्या जेएमडीवायसी खुल्या पिकलबॉल स्पर्धेत अरमान भाटिया-अनिरुद्ध धौर्यवान यांनी सुवर्ण पदक पटकावले. दोघांनी
अनपेक्षित कामगिरी करताना गौरव राणे-कश्यप बरनवाल या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अंतिम फेरीत पराभवाचा धक्का दिला. महिला दुहेरीत जळगावच्याच खेळाडूंमध्ये झालेल्या अंतिम फेरीत वृशाली ठाकरे-स्नेहल पाटील यांनी सुवर्ण यश मिळवले.

पुरुष दुहेरी अंतिम सामन्यात अरमान-अनिरुद्ध यांनी पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना गौरव-कश्यप या कसलेल्या जोडीला ७-११, ११-१०, ११-१० असा धक्का दिला. प्रणव रोहिरा-वंशिक कपाडिया यांनी आदित्य सेठ-मारियस परेरा यांना १५-९ असे नमवत कांस्य पदक जिंकले. महिला दुहेरीत, वृशाली-स्नेहल यांनी सुवर्ण जिंकताना साक्षी बाविसकर-पूजा वाघ यांचा ११-८, ११-१० असा पराभव केला.
————–
६० वर्षांवरील खेळाडूंचा दमदार जोश

६० वर्षांखालील खेळाडूंनी जबरदस्त जोश दाखवला. गिरिश शेनवी-रमेश मसुरेकर यांनी सुवर्ण जिंकताना सुनील वझीरानी – अलोक थिरानी यांचा १५-५ असा पराभव केला. अन्य लढतीत दिलीप कारेकर-बाळकृष्ण अय्यर यांनी कांस्य जिंकताना सुनील थेंगोडकर-शिरिश व्ही. यांना १५-७ असे नमवले. ५० वर्षांवरील गटात संदीप तावडे-रमेश यांनी अशोक नथानी-सुरेश भन्साली यांना ११-५, ११-८ असे नमवत सुवर्ण जिंकले. चेतन सनील-सॅव्हिओ रॉड्रिग्ज यांनी कांस्य पदक पटकावताना मनोज जाजू-राजीव कसाट यांचे आव्हान १५-१३ असे परतावले.
———–

४० वर्षांवरील गटात अजय सेठ-समीर ओक यांनी सुवर्ण पटकावले, तर संदीप-मारियस यांना रौप्यवर समाधान मानावे लागले. मिहिर खंडेलवाल – अभिषेक साप्रे यांनी कांस्य पदक जिंकले. ३५ वर्षांवरील महिला दुहेरीत बेला कोटवानी-रुची शाह यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. लीना मुळगावकर-मनीषा बरोट यांनी रौप्यवर समाधान मानले. कांस्य पदकाच्या लढतीत आरती पटेल-तृप्ती सिंग यांनी बाजी मारली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!