आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

रावेत येथील.DNV ARCELIA, सोसायटीत, होळी चा सण उत्साहात साजरा.

Spread the love

रावेत येथील.DNV ARCELIA, सोसायटीत, होळी चा सण उत्साहात साजरा.At DNV ARCELIA, Society in Ravet, the festival of Holi is celebrated with enthusiasm.

आवाज न्यूज : रावेत, प्रतिनिधी ७ मार्च..

अपप्रवृत्तीना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव, संपूर्ण भारतभर साजरा करणारा होळी चा सण,DNV ARCELIA,RAVET. येथे देखील साजरा करण्यात आला यावेळी, सोसायटी प्रांगणात, मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.विधिवत पूजा करून सोसायटीमध्ये होलिका दहन करण्यात आला.

 

खरेतर जुने जे जे वाईट असेल ते सोडून देऊन, नव्याचे स्वागता साठी सिद्ध होण्याचा हा सण आहे.
सृष्टीही या काळात बदलत असते, वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवीन पालवी धारण करीत असतात,अनेक झाडांना मोहर आलेला असतो.

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!