क्रीडा व मनोरंजन

संच मान्यतेचे निकष निश्चिती संदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालयात बैठक

Spread the love

दि. १७/०१/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या राज्यातील प्रतिनिधी समवेत शिक्षण आयुक्त कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत शिक्षण संचालकांसह शिक्षण विभागातील संबंधित वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. शालेय स्तरावरील शिक्षकांच्या पद भरती, वरिष्ठ व निवड श्रेणी अशा विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस महासंघाचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, उपाध्यक्ष आर. डी. पाटील, मिलिंद क्षिरसागर, सचिव चांगदेव पिंगळे, कार्यालयीन सचिव सुरेश मुळुख, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आर. डी. खैरनार, सातारा जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र माने, पुणे शहराध्यक्ष कमलाकर डोके, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अंगद गरड, सचिन दुर्गाडे, कल्याण अवसरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

शालेय स्तरावर बी.एड. समकक्ष बी.पी.एड. / बी.एड. (फिजी.) अर्हतेच्या शिक्षकांच्या पद भरती निश्चित ठरविताना बी.एड., बी.पी.एड./ बी.एड. (फिजी.) या सर्व अर्हतेत भेदभाव न करता समान ” दर्जा दयावा, या अर्हतेच्या शिक्षकांना शासनाने दि. १४ मे, १९८७ रोजी निर्गमित केलेल्या अध्यादेशा (GR) प्रमाणे निकष निश्चित करावेत व ही अर्हता प्राप्त करताना घेतलेल्या दोन्ही मेथडचा कार्यभार अध्यापनासाठी विचारात घेवुनच शारीरिक शिक्षण शिक्षकाची पद निश्चिती करावी अशी मागणी केली. हा शिक्षक केवळ शारीरिक शिक्षण विषय अध्यापनापुरता मर्यादीत नाही, बी.एड. प्रमाणे हा शिक्षक ही दोन मेथडचे अध्यापन करण्पास पात्र आहे. या बाबत अहर्तेतील समकक्षतेच्या अनेक पैलुवर प्रकाश टाकण्यात आला. शालेय स्तरावर विविध विषयाचे अध्यापन केले जाते. यासाठी असलेल्या बी.एड. व बी.पी.एड. / बी.एड. (फिजी.) अर्हतेच्या शिक्षक पद निश्चितीचे निकष ठरविताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता संच मान्यता व वैयक्तीक मान्यतेच्या प्रस्तावात बी.एड. बरोबरच बी.पी.एड./बी.एड. (फिजी.) या अर्हतेचाही उल्लेख केला जावा. तसेच दि. १४ मे १९८७ च्या शासन निर्णयामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे खाजगी शाळा सेवा शर्तीच्या नियमात सुधारणा करण्यासाठी असा प्रस्ताव मा. संचालकांनी शासनाकडे पाठवावा अशी विनंती केली व ती मान्य करण्यात आली.

शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या वरील बैठकीत संच व वैयक्तीक मान्यता निकष या मधील सुधारणासह वरीष्ठ व निवड श्रेणी, अंशकालीन शिक्षक भरती प्रक्रिया आणि शालेय स्तरावरील सलग कार्यभारा संदर्भातील अनेक बाबीवर चर्चा झाली. वरिष्ठ व निवड श्रेणी साठी एम.पी.एड. होण्याची अट शिथिल करुन इयत्ता १० वी पर्यंत अध्यापणासाठी उपयुक्त असणाऱ्या कोणत्याही विषयाची उच्च पदवी प्राप्त अर्हता • मान्य करावी ही मागणी केली. याच बरोबर विद्यार्थी संख्येवर पद भरती करताना पुरेसा कार्यभार लक्षात घेण्याची अट टाकताना इयत्ता ५ वी ते १० वी पर्यत असलेल्या माध्यमिक शाळेतील विषयवार सलग कार्यभार लक्षात घेण्यात यावा ही मागणी केली. सलग कार्यभारामुळे शालेय स्तरावरील अनेक समस्या दूर होणार असल्याचे या वेळी लक्षात आणुन दिले. प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील विषय व वर्गवार अध्यापन कार्य पद्धती मधील फरक व समस्या आणि प्रभावी अध्यपनासाठी शिक्षकांचा सर्व वर्गांचा सलग कार्यभार लक्षात घेण्याची गरज लक्षात आणुन दिली. सुमारे अडिच तास चाललेल्या या बैठकीतली सर्व चर्चा सकारात्मक होवुन भावी पिढीला दिशा देणारी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!