ताज्या घडामोडी

शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी संजय घोडे-पाटील,पत्रकार हल्ला विरोधी संघटना अध्यक्ष मनोज मस्के

Spread the love

शिराळा प्रतिनिधी :
शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी संजय घोडे-पाटील तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्ष पदी मनोज मस्के यांची निवड झाल्याबद्दल शिराळा येथे तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, शिराळा वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव,नगरपंचायतचे मुख्यअधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील, हंबीरराव देशमुख हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय घोडे-पाटिल, उपाध्यक्ष पदी दत्तात्रय पाटील, दत्तात्रय तडाखे, कार्यअध्यक्षपदी संतोष बांदिवडेकर,सचिव विजय कांबळे तर जिल्हा कार्यकारिणीत शिवाजी चौगुले,विजय गराडे, रणजित चव्हाण यांची निवड झाली.
शिराळा तालुका मराठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्ष पदी मनोज मस्के, उपाध्यक्ष रवि यादव, कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, सचिव जितेंद्र गायकवाड, सल्लागार हंबीरराव देशमुख यांची निवड झाल्याबद्दल करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या पदाधिकारी व विविध क्षेत्रात प्रावीण्याबद्दल अनेक मान्यवरांचा शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर, वनक्षेत्रपाल सचिन जाधव, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. दैनिक तरुण भारतचे प्रीतम निकम, दैनिक वसंत सागरचे संपादक आनंदा सुतार, विशाल खांडेकर आदी पत्रकार उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक संजय घोडे पाटील यांनी केले. आभार दैनिक सकाळचे शिवाजी चौगुले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!