ताज्या घडामोडी

संविधानिक मूल्यांप्रति जागृत असणारा अनुभूतीचा नवा आविष्कार म्हणजे कविता- कवी दयासागर बन्ने

Spread the love

संविधानिक मूल्यांप्रति जागृत असणारा अनुभूतीचा नवा आविष्कार म्हणजे कविता होय. कविता ही बौद्धिक धडपड नसून भावनिक होरपळ समजून घेणे आहे. या दिशेने आजची कविता वाटचाल करत आहे याचा प्रत्यय कामेरीच्या संमेलनात आला‌. असे मत कवी दयासागर बन्ने यांनी व्यक्त केले.ते कामेरी येथील मातृस्मृती ग्रामीण साहित्य संमेलनातील कवी संमेलनात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. उत्स्फूर्त प्रतिसादात संमेलन संपन्न झाले.

दयासागर बन्ने पुढे म्हणाले की, सामान्य माणसाचे हित आणि कृषीसंस्कृतीच्या सन्मानाप्रती भाष्य करणारी कविता महत्वाची असते,अभिव्यक्तीवर बंधने लागण्याच्या काळात सामान्य माणसाच्या हिताचे विधान करणे ही कवीची भूमिका हवी. भीतीच्या आणि गुलामीच्या भावनेतून सरपटत कण्याने जगण्यापेक्षा प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करणारा एल्गार कवितेतून व्यक्त व्हावा.
यावेळी कविसंमेलनात आई ,नाती ,निसर्ग ,सामाजिक समस्या आणि शेती मातीच्या कविता सादर करून कवींनी रसिकांची मने जिंकली. संजीवनी तडेगावकर, भीमराव धुळूबुळू, संजय बोरुडे, बाळासाहेब लबडे, धनाजी घोरपडे, अभिजीत पाटील,संजय ठिगळे, दीपक स्वामी, मनीषा पाटील, ऋजुता माने, संतोष काळे, गौतम कांबळे, संदिप नाझरे ,नथूराम पवार, मनीषा रायजादे, आबासाहेब शिंदे, सुनील नायकल, रवी बावडेकर, वंदना हुळबत्ते , शहनवाज मुल्ला, आनंदहरी , मेहबूब जमादार,भारती पाटील, अनिल लोहार, रमेश खंडागळे, अशोक निळकंठ आदींनी कविसंमेलनात कविता सादर केल्या. रमजान मुल्ला यांनी सूत्रसंचालन करुन संमेलनात रंगत आणली. स्वागत संमेलनाचे निमंत्रक दि.बा. पाटील यांनी केले तर आभार अजिंक्य कुंभार यांनी मानले.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षीय नेहमी प्रमाणे उत्तम झाले. नामदेव भोसले, श्रीकांत पाटील, अनिलकुमार पाटील यांचा साहित्यातील आई हा परिसंवाद रंगला. कवी गणेश मरकड यांच्या हस्ते विजय चोरमारे,बी.एस.पाटील, वासंती मेरु, सुनिता बोर्डे , संजीवनी तडेगावकर यांना हौसाई स्मृती साहित्य पुरस्काराचे वितरण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!