आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजमहाराष्ट्र

मौजे शिवणे ता. मावळ येथील मंडल अधिकाऱ्यावर लाच स्वीकारले प्रकरणी कारवाई..

शिरगाव - परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७.७ अ. [१२] १. लोकसेवक संगीता राजेंद्र शेरकर, वय ५४ वर्षे मंडल अधिकारी,गुन्हा दाखल..

Spread the love

मौजे शिवणे ता. मावळ येथील मंडल अधिकाऱ्यावर लाच स्वीकारले प्रकरणी कारवाई..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ६ डिसेंबर.

संगीता राजेंद्र शेरकर , असे लाच घेतल्या प्रकरणी अटक केलेल्या मंडलाधिकारी महिला.व खाजगी व्यक्ती संभाजी लोहोर असे लाचघेतल्या प्रकरणी अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी २०१९ मध्ये भडवली येथे जमीन घेतली होती. त्या जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी शिवणे मंडलाधिकारी यांनी २०००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.

मावळात महसूल विभागात जमीन सातबारा नोंद, अतिक्रमण, बेकायदा उत्खनन, मालकी हक्क, ताबा, फेरफार, शेतकरी असल्याचा पुरावा, 32 ग,  पाटील इनाम विक्री परवाना आदींमध्ये तलाठी, मंडलाधिकारी यांना कुरण असते. शेतकऱ्यांना त्यांच्या कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. अखेर शेतकरी यांना पैसे देण्यासाठी कबुल होतो. पण काही हजारात पैसे असल्याने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक  विभाग पुणे येथे धाव घेतात. अखेर त्यांच्यावर कारवाई होते.

०६/१२/२०१२ रोजी आढले बुद्रुक तलाठी कार्यालय ता. मावळ जिल्हा पुणे.  यातील तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या मौजे भडवली तालुका मावळ येथील जमिनीच्या ७/१२ उतार्यावर त्यांचे नाव लावण्याकरीता लोकसेवक शेरकर यानी २०,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार सा.प्र.वि. पुणे येथे दिली.

सदर तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवक संगीता शेरकर व खाजगी इसम संभाजी लोहोर यांनी २०,०००/- हजार रूपये लाचेची मागणी करून लोकसेवक क्र. १ संगीता शेरकर यांनी स्वीकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,  अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस हवालदार पौर्णिमा साका, पोलीस हवालदार दीपक दिवेकर, पोलीस अंमलदार सौरभ महाशब्दे  आदींनी आढले बुद्रुक तलाठी कार्यालयात सापळा रचला असता, मंडलाधिकारी यांनी २०००० रुपयांची लाच घेताना अटक केली. त्यांच्यावर शिरगाव – परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७.७ अ. [१२] १. लोकसेवक संगीता राजेंद्र शेरकर, वय ५४ वर्षे मंडल अधिकारी,गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!