ताज्या घडामोडी

श्री विनायक राऊत यांचे जाकादेवी प्रशाला व मालगुंड शिक्षण संस्थेतर्फे खास अभिनंदन*

Spread the love

जाकादेवी/वार्ताहर:- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान सचिव, शालेय प्रशासनाचे अभ्यासक तसेच बळीराम परकर विद्यालय व भाई मयेकर जुनिअर कॉलेजचे सी.ई.ओ.विनायक तुकाराम राऊत यांची जायंटस वेलफेअर फाउंडेशनच्या २ ड च्या अध्यक्षपदी कोकण प्रांतातून निवड झाल्याबद्दल जाकादेवी प्रशाला व मालगुंड शिक्षण संस्थेतर्फे बुके देऊन त्यांचे जाकादेवी येथील पालक सभेत खास अभिनंदन करण्यात आले.
शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते बुके देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी शिक्षण संस्थेचे संचालक व सी.ई.ओ. किशोर पाटील,खजिनदार संदीप कदम , संचालक विवेक परकर, श्रीकांत मेहेंदळे, मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे सचिव रोहित मयेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर,संकेत देसाई ,पर्यवेक्षक भूपाल शेंडगे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार,योगेश चव्हाण,अमित बोले , मंदार रसाळ यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. विनायक राऊत सर यांनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम केले आणि विविध संस्थांवरआजही ते सक्रिय आहेत.राऊत सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कामाची दखल घेत जायंटस वेल्फेअर फेडरेशन फाउंडेशने कोंकण प्रांतातून विनायक राऊत यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड केली. या निवडीबद्दल शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी आनंद व्यक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!