ताज्या घडामोडी

ठाणे स्पोर्टिंग क्लब निवडणूक; मढवी गटाला ५ जागा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

मुंबई : नुकत्याच झालेल्या ठाणे सेंट्रल मैदानातील स्पोर्टिंग क्लबच्या त्रैवार्षिक निवडणुकीत डॉ. राजेश मढवी यांच्या गटाला ५ तर प्रतिस्पर्धी विकास रेपाळे यांच्या गटाला ४ जागा मिळाल्या. एकूण १४९ पैकी १३८ सभासदांनी मतदान केले. दोन्ही गटाचे प्रत्येकी ९ उमेदवार रिंगणात होते. एकूण ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते. मढवी यांना सर्वाधिक ९४ मते पडली. त्यांच्याच गटातील दिलिप धुमाळ, किशोर ओवळेकर, योगेश महाजन, सुशिल म्हापुरसकर हे देखील विजयी झाले. तर रेपाळे यांना ८० मते मिळाली. त्यांचे सहकारी कैलाश देवल, श्रावण तावडे, प्रशांत गावंड यांचा देखील विजय झाला. आता अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे स्पोर्टिंग क्लबच्या सदस्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!