ताज्या घडामोडी

उद्योजक वैभव शिंदे (पाटील) यांना महाराष्ट्र बिझनेस पुरस्काराने सन्मानित

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. १२ (प्रतिनिधी) : उस्मानाबाद जिल्ह्यातील बिझनेसमध्ये करिअर घडवण्याचा संकल्प करणारे उमरगा तालुक्यातील मुरूम येथील रहिवाशी तरूण उद्योजक वैभव शिंदे यांनी महाविद्यालयीन शिक्षण शिकत असताना फोटोग्राफीत स्वतःचे करिअर करण्याची भूमिका घेऊन त्यात आवड निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे सलग ३ वेळा स्पॉट फोटोग्राफीमध्ये पारितोषीक पटकावले. आपल्या कलेचा उपयोग करुन आपल्या व्यवसायात करिअर करून प्रगती करणारे वैभव यांनी आपल्या राजमुद्रा फोटोग्राफी या स्टुडिओची सुरुवात ७ सप्टेंबर २०१७ ला गावातून सुरुवात केली. आज या व्यवसायात उत्तुंग भरारी घेत आपल्या घराची जबाबदारी सांभाळत आहेत. या त्यांच्या नावीन्यपूर्णतेमुळेच या पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. वैभव यांना महाराष्ट्रासह, कर्नाटक राज्यासह आजू-बाजूच्या जिल्ह्यातून सर्व शुभ कार्यासाठीचे फोटोग्राफी व व्हिडीओग्राफीसाठी बोलावण्यात येते. वैभव यांनी या अगोदर मकरंद अनासपुरे, संदीप पाठक अशा मराठी कलाकारांकडून ही पुरस्कार मिळाले आहेत. वैभव शिंदे यांना फोटोग्राफीमधील गुरू फोटोग्राफर गोपाळ इंगोले हे होते. तसेच महाविद्यालयात असताना प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले व प्रा. डॉ. महेश मोटे यांचेही मार्गदर्शन लाभले. आज पर्यंतच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील सर्वात मोठा समजला जाणारा हा पुरस्कार यांना नाशिक येथे ता. ११ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध मराठी कलाकार अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पुरस्कार स्वीकारताना सोबत वैभव व लहान भाऊ विकास शिंदे (पाटील) हे होते. या पुरस्काराने गावात वैभव यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!