ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात

Spread the love

पावस-रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रारंभीस डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष कडवईकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री.संतोष कडवईकर, पदवीधर शिक्षिका स्नेहल कांबळे , उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, शंकर वरक, बालसभा अध्यक्षा समीक्षा मांडवकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद मेर्वी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वकृतव स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्र आणि माहिती स्वरूपात इयत्ता सहावी च्या विद्यार्थ्यांनी कोलाज तयार केले.
त्यानंतर मुख्याध्यापक श्री.संतोष कडवईकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, शंकर वरक आदिंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले .
शेवटी स्वामिनी मेस्त्री हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मुख्याध्यापक संतोष कडवईकर. सोबत चंद्रशेखर पेटकर, शंकर वरक आदि मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!