आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

गणपती विरुद्ध गणपती केस….

मानाच्या पाच गणपती मंडळांना सकाळी लवकर निघायचे नसेल तर, त्यांनी व पोलीस प्रशासनाने लहान मंडळांना सकाळी लवकर निघण्याची परवानगी द्यावी. बढाई समाज ट्रस्ट चे अध्यक्ष शैलेश बढाई.

Spread the love

  सामाजिक: गणपती विरुद्ध गणपती केस

आवाज न्यूज: पुणे प्रतिनिधी.. ७ सप्टेंबर..

पुण्यातील पाच मानाची गणपती मंडळेच लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढतात व विसर्जन मिरवणुकीला खुप मोठा कालावधी लागतो, पाच मानाच्या गणपती मंडळांनी सकाळी लवकर मिरवणूक सुरु करावी, त्यामुळे लहान मंडळांना ही विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येईल. मानाच्या पाच गणपती मंडळांना सकाळी लवकर निघायचे नसेल तर त्यांनी व पोलीस प्रशासनाने लहान मंडळांना सकाळी लवकर निघण्याची परवानगी द्यावी.

भेदभाव न करता इतर लहान गणेश मंडळांना सुद्धा लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक काढू द्यावी जवळ-जवळ १०० च्या वर लहान मंडळांचा पाठिंबा या याचिकेला होता ही याचिका पुणे बढाई समाज ट्रस्ट चे अध्यक्ष शैलेश बढाई, यांनी केली होती परंतु ती ऐकून घेण्यास आज उच्च न्यायालयाने नकार दिला. आम्हाला लक्ष्मी रस्त्याचा वापर करण्यास पोलिसांनी नकार दिला असे अनेक गणपती मंडळांचे म्हणणे आहे का? मग जनहित याचिका का नाही दाखल केली?

केवळ एकाच मंडळाने ही याचिका का केली? पोलिसांनी नकार दिल्याचे लेखी पत्र दाखवा असे मत न्यायायलाने व्यक्त केले. मानाच्य गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी २४ ते २८ तास लागतात हे आताच गृहीत धरता येणार नाही, पोलीस त्यांचे काम नीट करतील असे म्हणत याचिका ऐकून घेण्यास नकार देऊन निकालात काढली आहे.

आता अनेक गणपती मंडळे पोलिसांकडे अर्ज करतील की आम्हाला पाच मानाच्या गणपतींच्या आधी मिरवणूक काढू द्यावी. परंपरा म्हणजे अन्याय असे नसते. मोठा कालावधी वाया घालवीत विलंबाने होणाऱ्या विसर्जन मिरवणुका, पोलिसांवर येणारा शारीरिक-मानसिक तणाव व पोलिसांच्या श्रमाचे शोषण, नागरिकांची गैरसोय, अनेक लहान मंडळाचे म्हणणे अश्या व्यापक प्रश्नांच्या बद्दल गणेशोत्सवाला नवीन अर्थ देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत: संजय बालगुडे व भाऊ करपे म्हणाले.

आज एका चुकीच्या रुढीविरुद्ध आवाज उठवण्याची सुरुवात झाली आहे, अगदी उच्च न्यायालयात हा प्रश्न मांडण्यात आला. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीबाबत पोलीस निर्णय घेतील किंवा नाहीत पण नवीन दमाने व अनेक पुराव्यांसह पुन्हा याचिका करण्यात येईल. कारण लक्ष्मी रस्त्याचा वापर प्राधान्याने पाच मानाच्या गणपती मंडळांनी करावा यासाठी न्यायालयाने कोणतीही परवानगी दिलेली नाही त्यामुळे मुद्दा कायम आहे व तो पुन्हा मांडला जाईल, बदल घडविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!