ताज्या घडामोडी

पत्रलेखन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचे यश मोठ्या गटात जेबा आत्तार तर लहान गटात मोसाद आत्तार प्रथम

Spread the love

शिराळा : प्रतिनिधी

मातीचे जतन आणि संवर्धन हा विधायक दृष्टिकोन जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी 169 देशांमध्ये सुरू असलेल्या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पत्र लेखन स्पर्धेत वारणावती (ता. शिराळा) येथील न्यू इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी जेबा सल्लाउद्दीन आत्तार हिने नववी ते बारावी या मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. वैष्णवी प्रकाश पाटील व तनिषा लक्ष्मण पाटील यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
पाचवी ते सातवी या लहान गटात मोहम्मद साद सल्लाउद्दिन आत्तार याने प्रथम तर माधवी नामदेव बेनाडे व निर्विघ्न दत्तात्रय पाटील यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
भारतीय लोकशाहीत सर्वसामान्य नागरिकांचे मत देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्ती समोर मांडणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. हे पत्र भारताचे पंतप्रधान यांचे नावे लिहून माती संवर्धना चे उपाय सुचवणे असा या पत्रलेखनाचा विषय होता.
यशस्विनी फाउंडेशन आणि इशा फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मार्फत या स्पर्धा घेण्यात आल्या.
यशस्विनी फाउंडेशन मुंबईच्या संस्थापक रेणुकादेवी देशमुख यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांना सलाउद्दीन आत्तार, मारुती माने भारती कुंभार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक लहू कुरणे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.यावेळी वनपाल शिवाजी पाटील, वनरक्षक जयसिंग महाडिक, गजानन सकट यांचेसह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!