ताज्या घडामोडी

इस्लामपूर सार्वजनिक बांधकाम कार्यालयात माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक

Spread the love

शिराळा प्रतिनिधि / इस्लामपूर (ता. वाळवा) येथील सार्वनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात शिराळा मतदार संघातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर आवश्यक ठिकाणी नागरिकांसाठी सोई, सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत बैठक झाली. बैठकीस राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटीलसाहेब प्रमुख उपस्थित होते. यावेळी बैठकीत कणेगाव, येलूर, कामेरी, विठ्ठलवाडी, वाघवाडी, नेर्ले, केदारवाडी, येवलेवाडी व कासेगाव येथे अंडरपासींग करण्याबात आमदार मानसिंगराव नाईक यांनी आग्रही मागणी केली आहे. त्याबाबत माजी मंत्री पाटीलसाहेब व आमदार मानसिंगभाऊ यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीस युवा नेते प्रतिक पाटील, नॅशनल हायवे अथोरटी ऑफ इंडियाचे विभागीय कार्यालय प्रकल्प अधिकारी वसंत पंढारकर, राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. सांगावकर, सार्वजनिक बांधकाम विभाग सांगलीचे कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्र काटकर, उपकार्यकारी अभियंता सुभाष पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!