ताज्या घडामोडी

जाकादेवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात भित्तीपत्रकाचे अनावरण

Spread the love

जाकादेवी/वार्ताहर:- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक व जाकादेवी हायस्कूलचे सी.ई.ओ.किशोर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाने उत्साहात संपन्न झाला.यावेळी सी.ई.ओ.किशोर पाटील यांनी फीत कापून भित्तीपत्रकाचे अनावरण केले.
यावेळी राष्ट्रीय गीते, क्रांतिकारकांचा जयघोष करण्यात आला.स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी संचलन केले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर व संग्रहित साहित्यातून तयार झालेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन तसेच नळपाणी योजनेचे उद्घाटन शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे धडाडीचे विद्यमान चेअरमन बंधू मयेकर, सचिव विनायक राऊत, संचालक किशोर पाटील, श्रीेकांत मेहेंदळे, दिवाकर पवार , तानाजी दुधाळे,माजी मुख्याध्यापक हनुमंत कदम, प्रकाश कांबळे, मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक भूपाळ शेंडगे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख व स्काऊटर संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते प्रतिक देसाई, ऋषिकेश उर्फ बंटी सुर्वे,परीस पाटील,श्रीमती डोंगरे ,श्री वसंत देवरुखकर, क्रीडाशिक्षिका मनिषा धोंगडे, अमित बोले, योगेश चव्हाण, मंदार रसाळ, अवधूत जाधव यांच्यासह अनेक मान्यवरउपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. राष्ट्रीय गीते, क्रांतीकारकांचा जयघोष करण्यात आला. प्रमुख पाहुणे किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय संविधानाचे महत्व, अर्थ, भारतीय संविधानातील तत्वांचा मूल्यांचा अर्थ जाणून घेऊन आपले जीवन समृद्ध करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा क्रांतिकारी इतिहास समजून घेऊन जीवनात चांगल्या प्रकारे वाटचाल करावी, असे उपस्थितांना आवाहन केले.यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहासातील काही ठळक बाबी सांगून शूर वीरांचे स्मरण करून बहुमोल मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी, सूत्रसंचालन संतोष पवार यांनी तर आभार भूपाल शेंडगे यांनी मानले. या दिनाचे साधून शशिकांत कांबळे ,अरविंद कोळवणकर यांनी मुलांसाठी गोळ्या तर सामाजिक कार्यकर्ते प्रतिक देसाई, बंटी सुर्वे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शालेय सर्व विद्यार्थ्यांना सुमारे ३०किलो जिलेबी देऊन अमृतमहोत्सवी वर्षांला शुभेच्छा दिल्या. हा समारंभ अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला.उत्सव यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!