आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

जातनिहाय जनगणना करण्याची मागणी राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल च्या वतीने करण्यात आली.

एकीकडे पशु पक्षांची गणना केली जाते, माञ माणसांची त्यांच्या घटकानुसार गणना केली जात नाही.

Spread the love

जातनिहाय जनगणना करण्याची मागणी राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल च्या वतीने करण्यात आली.

आवाज न्यूज : विशेष प्रतिनिधी, १२ जानेवारी..

इतर मागासवर्गीय घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व ज्याची जेवढी संख्या, त्याची तेवढी भागिदारी! या नैसर्गिक नियमानुसार सर्व जातींची व घटकांची बिहार राज्याच्या धरतीवर जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे.यासाठी महाराष्ट्रराज्याचे माजी उपमुख्यमंञी.भुजबळ साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंञी यांना पञाद्वारे जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली.

एकीकडे पशु पक्षांची गणना केली जाते, माञ माणसांची त्यांच्या घटकानुसार गणना केली जात नाही.

यामागे काही जाती व धर्मांध संस्थेचे कुटिल कारस्थान आहे.
प्रत्येक घटकाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय लाभ,आरक्षण ,त्याच्या हिश्श्याचा वाटा मिळणे सामाजिक द्रुष्ट्या गरजेचे आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास प्रत्येक वर्गाची,जाती,पोटजातींची आकडेवारी व लोकसंख्या समोर येउन प्रत्येक घटकाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ व न्याय देणे सोयीचे होईल.

जातनिहाय जनगणनेमुळे ओ.बी.सी.अरक्षणाचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल तसेच मराठा व धनगर आरक्षण मार्गी लागून मुस्लिम समाजाला व सर्वसाधारण घटकाला देखील आरक्षणाचा लाभ उपलब्ध होईल. तसेच जातनिहाय जनगणनेमुळे आरक्षणाच्या मुद्दयावर होणारे जातीपाती मधील संघर्ष कायमचे निकाली निघेल.त्यामुळे राज्याच्या विकासासाठी जातनिहाय जनगणना गरजेची आहे.
जातनिहाय जनगणनेमुळे इतर मागावर्गीय तसेच मागास राहिलेला समाजाला घटनात्मक संरक्षण प्रप्त होईल.सर्वोच्च न्यायालयाने देखील इतर मागासवर्गीयांची लोकसंख्येची आकडेवारी मागितलेली असुन जनगणनेमुळे सर्वोच्च न्यायालयात सदरील आकडेवारी देण्यात येऊन ओ.बी.सी.चे आरक्षण कायम करता येईल.

त्यामुळे जातनिहाय जनगणना करण्यात यावी.ही विनंती!अन्यथा मोठे जन आंदोलनाचा इशारा शहराध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी उपजिल्हाधिकारी. डोईफोडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आलेला आहे. यावेळी हाजी मोहिय्योद्दीन शेख, नासिर पठाण, प्रकाश माळोदे, गणेश मोरे, ॲड.संदीप दंडगव्हाण, भारतीताई चित्ते, रेखाताई शेलार, यादव गुंबाडे, हेमा परदेशी, पूजा परदेशी, सागर बडगुजर, ॲड.अक्षय आडके, बुरडे ताई, सचिन पाटील, अनिल चव्हाणके, बाळासाहेब हेंबाडे,  मनोज कर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!