आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

लोणावळ्यात तुंगार्ली येथील बंगल्याचे स्विमिँगपूल जवळ विजेच्या धक्याने बालकाचा मृत्यू ,पावसाळ्यातील दुसरी दुर्घटना !!

पावसाळ्यातील दुसरी दुर्घटना असून पंधरा दिवसापूर्वी स्विमिँग पूल मध्येअशीच दुर्घटना घडून दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता.

Spread the love

लोणावळ्यात तुंगार्ली येथील बंगल्याचे स्विमिँगपूल जवळ विजेच्या धक्याने बालकाचा मृत्यू ,पावसाळ्यातील दुसरी दुर्घटना !!

आवाज न्यूज लोणावळा ता.२९(प्रतिनिधी ) लोणावळ्यात तुंगार्ली येथील बंगल्याचे स्विमिँगपूल जवळ विजेच्या धक्याने तेरा वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. पावसाळ्यातील दुसरी दुर्घटना असून पंधरा दिवसापूर्वी स्विमिँग पूल मधे अशीच दुर्घटना घडून दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता.
हरून मसूद वाली (वय-१३, रा-२/प्लींच , , ९०२,एविवर्सल , प्लॕट नंबर -२८८, जोगेश्वरी ,( पश्चिम ),मुंबई ) असे मृत बालकाचे नाव आहे. गुरूवारी राञी सव्वा आठ ते साडेआठ दरम्यान रिसेंट व्हीला या खाजगी बंगल्याच्या पोहण्याचे तलावाजवळ हा अपघात घडला.

खबर देणार :इमरान मसूद वाली ,रा-जोगेश्वरी (पश्चिम ) , मुंबई ,) यांनी दिलेल्या माहितीवरून लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एल.टी.उंडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि आपघाताचा पंचनामा केला. तसेच आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून मृतदेह खंडाळा येथे उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

घडलेली घटना अशी : हरून वाली त्याचे आईवडीलांसह नात्यातील चारपाच लोक असे लोणावळ्यात फिरायला आले होते. तुंगार्लीतील रिसेंट व्हिला , या खाजगी बंगल्याचे पोहण्याचे तलावात हरून हा आणि नातेवाईकांच्या चार पाच मुलांसह पोहण्याचे तलावात पोहत होता. तो पोहून तलावाचे बाहेर आल्यावर त्याने ओला हात स्विमिंग पूलाचे भिंतीला व खांबाला लावला , त्यावेळी वरील विजेचा दिवा खाली आला.त्या वायरला स्पर्श झाल्याने हरून ला विजेचा धक्का बसून तो खाली पडला. त्याला तातडीने रूग्णालयात हलविले ;पण तो उपचारापूर्वीच मृत्यूमुखी पडल्याचे डाॕक्टरांनी घोषित केले. या घटनेने लोणावळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पंधरा दिवसांमधे दुसरा बळी : स्ट्रक्चरल आॕडिटची मागणी.
बंगल्याचे आवारात असलेल्या व हाॕटेलमधे असलेल्या पोहण्याचे तलावांची चौकशी व्हावी आणि तेथे सुरक्षेसाठी जीवरक्षक नेमावेत तसेच तलावांचे स्ट्रक्चरल आॕडीट करण्यात आल्यानंतर परवाना देण्यात यावा ,अशी मागणी काही सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!