ताज्या घडामोडी

शेतकरी संघटनेचा प्रचार चटणी, भाकरी बांधून

Spread the love

कोल्हापूर (वर्षाराणी दुर्गे सरुडकर): पूर्वी ग्रामीण भागात ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली जात होती त्या धर्तीवर कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढणाऱ्या शेतकरी संघटनेने चटणी आणि भाकरी बांधून प्रचाराला सुरुवात केली आहे. हा त्यांचा प्रचार शहरवासीयांसाठी लक्षवेधी ठरली आहे. राधाकृष्ण चौक मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे एका झाडाच्या सावलीखाली भोजन करताना कार्यकर्ते दिसताहेत. सामान्य कार्यकर्त्याचा प्रचार कसा असतो हे आधुनिक काळात शेतकरी संघटनेने शहरवासीयांना दाखवून दिले आहे. सध्या उमेदवार म्हंटले की त्यांच्याकडे जेवणाची सुसज्ज सोय, गाड्या अशा सुविधा असतात. पण शेतकरी संघटनेने कशाचा गाजावाजा न करता आपला प्रचार सामान्य कार्यकर्तेप्रमाणे चालू केला आहे. एक कॉल प्रॉब्लेम सॉल या उक्तीप्रमाणे शेतकरी संघटनेने प्रचार यंत्रणा राबवून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!